Ladki Bahin Yojana : अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यात अजून का जमा झाले नाहीत पैसे?

2 Min Read
Ladki Bahin Yojana 7th Installment Not Received

Majhi Ladki Bahin Yojana 7th Installment Not Received : राज्यातील 2.41 कोटी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सातव्या हप्त्याचा लाभ मिळाला आहे. जून महिन्यात योजनेला प्रारंभ झाला होता, आणि त्या वेळी फॉर्म भरलेल्या महिलांना जुलैपासून नियमित लाभ मिळण्यास सुरुवात झाली होती. सातव्या हप्त्यापर्यंत महिलांच्या खात्यात आता एकूण 10,500 रुपये जमा झाले आहेत.

तथापि, अद्याप अनेक महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याच्या हफ्त्याचे 1500 रुपये जमा झालेले नाहीत (Ladki Bahin Yojana Installment Not Received). यावर महिलांना चिंता आहे की, त्यांचे अर्ज छाननीत बाद तर झाले नाहीत? यावर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी स्पष्ट केले की, योजनेच्या लाभार्थी महिलांची छाननी सुरू आहे. ज्या महिला निकषात बसत नाहीत, त्यांच्या अर्जांची स्वतंत्र पडताळणी केली जाईल.

🔴 हेही वाचा 👉 ABY: आयुष्मान भारत योजनेतून 1.25 लाख कोटींची बचत; वरिष्ठ नागरिकांसाठी ‘वय वंदना कार्ड’ आणि विशेष टॉप-अप लाभ.

काही महिलांच्या खात्यात पैसे न आले असल्याने त्यांनी अदिती तटकरे यांना प्रश्न विचारला आहे. विशेषतः महिलांना चिंता आहे की, त्यांचा अर्ज छाननीमध्ये बाद तर झाला नाही ना? या संदर्भात मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की, ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसोबतच दुसऱ्या सरकारी योजनेचा लाभ घेतला आहे किंवा लग्नानंतर राज्याबाहेर राहायला गेल्या आहेत, त्यांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार नाही.

🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नाहीत? काय करावे….

महिलांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी अदिती तटकरे यांनी अधिकाऱ्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे, पात्र असूनही ज्या महिलांच्या खात्यात अद्याप माझी लाडकी बहीण योजनेचे (Mazi Ladki Bahin Yojana) पैसे जमा झालेले नाहीत अशा महिलांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होण्याची शक्यता आहे.

🔴 हेही वाचा 👉 मोठी बातमी! ३० लाख महिला अपात्र? अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.

Share This Article