ABY: आयुष्मान भारत योजनेतून 1.25 लाख कोटींची बचत; वरिष्ठ नागरिकांसाठी ‘वय वंदना कार्ड’ आणि विशेष टॉप-अप लाभ!

2 Min Read
Ayushman Bharat Yojana Benefits Savings Elderly Top Up

Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमुळे देशातील गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 1.25 लाख कोटी रुपयांची बचत झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. सरकारने संसदेत सादर केलेल्या सर्वेक्षणानुसार, आयुष्मान भारत आरोग्य विमा योजना ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आहे, जी 12 कोटीहून अधिक कुटुंबांना (सुमारे 55 कोटी लोकांना) मोफत आरोग्य सेवा पुरवते.

70 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा

2024 मध्ये या योजनेचा विस्तार करताना 70 वर्षांवरील नागरिकांना समाविष्ट करण्यात आले. यामुळे 4.5 कोटी कुटुंबांतील 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांना मोफत आरोग्य विमा कवच मिळत आहे. याशिवाय, पात्र नागरिकांसाठी सरकार ‘वय वंदना कार्ड’ देणार असून, योजनेचा लाभ घेत असलेल्या व्यक्तींना दरवर्षी 5 लाख रुपयांचा विशेष टॉप-अप मिळणार आहे.

आयुष्मान भारत योजनेची प्रभावी अंमलबजावणी

  • 36.36 कोटींहून अधिक लोकांना आयुष्मान कार्ड देण्यात आले.
  • 30,000 हून अधिक सरकारी व खाजगी रुग्णालये या योजनेत सहभागी.
  • फ्री डायलिसिस योजनेतून 25 लाख लोकांना लाभ.
  • जन औषधी योजनेच्या माध्यमातून देशभरात 14,000 केंद्रांवर स्वस्त दरात औषधे उपलब्ध.

खाजगी आरोग्य खर्च मोठ्या प्रमाणात कमी

2015 ते 2022 या काळात देशाच्या आरोग्य खर्चातील सरकारी योगदान 29% वरून 48% पर्यंत वाढले आहे. परिणामी, नागरिकांचा खाजगी आरोग्य खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.

🔹 ही योजना देशातील आरोग्य सेवेसाठी मौल्यवान ठरत असून, पुढील काही महिन्यांत या योजनेत (Ayushman Bharat Yojana) आणखी मोठ्या संख्येने लाभार्थी जोडले जातील!

🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नाहीत? काय करावे….

Share This Article