लाडकी बहीण योजनेतील गैरप्रकार राज्य सरकारच्या निदर्शनास, केली जाणार कठोर कारवाई Ladki Bahin Yojana Corruption Action Maharashtra

2 Min Read
Ladki Bahin Yojana Corruption Action Maharashtra

Ladki Bahin Yojana Corruption Action Maharashtra : महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना आता एका वेगळ्याच वळणावर आली आहे. काही महिला या योजनेचा लाभ नियमांचे उल्लंघन करून घेत असल्याचे उघडकीस आले आहे. या गैरप्रकारामुळे राज्य सरकार खडबडून जागे झाले असून, संबंधित महिलांवर आणि त्यांना मदत करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी याबाबत माहिती दिली आणि अशा प्रकरणांवर कठोर कारवाई होणार असल्याचा इशारा दिला आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) योजनेअंतर्गत सध्या महिलांना प्रतिमहिना 1500 रुपये दिले जात होते. सात महिन्यांमध्ये महिलांच्या खात्यावर एकूण 10,500 रुपये जमा झाले आहेत. मात्र, काही ठिकाणी बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली, ज्यामुळे सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडला. यामुळे सरकारने योजनेमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.

सदर गैरप्रकार राज्य सरकारच्या निदर्शनास आले आहेत, ज्यामुळे अधिक चौकश्या सुरू करण्यात आल्या आहेत. अदिती तटकरे म्हणाल्या की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. योजनेसाठी योग्य पात्रता असलेल्यांनाच लाभ मिळावा, यासाठी आम्ही सजग आहोत.”

लाडकी बहीण योजना कायम सुरु ठेवली जाईल, परंतु यामध्ये सुधारणा करून फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. अस अदिती तटकरे म्हणाल्या.

🔴 लेटेस्ट अपडेट 👉 2025 मध्ये सोन्याच्या किमतीत होणार मोठी घसरण? इकोनॉमिक सर्वे 2024-25 मध्ये मोठा अंदाज.

Share This Article