Majhi Ladki Bahin Yojana Payment Not Received Complaint Process : महाराष्ट्र सरकारच्या ‘माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत महिलांना दरमहा ₹1500 ची आर्थिक मदत दिली जाते. जानेवारी महिन्याचा हफ्ता 24 ते 26 जानेवारी 2025 दरम्यान पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला. मात्र, काही महिलांना अजूनही पैसे मिळालेले नाहीत. अशा परिस्थितीत महिलांनी काय करावे? कुठे तक्रार करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
‘माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पैसे न मिळाल्यास काय करावे?
तुम्ही पात्र असूनही जर अद्याप तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे (Ladki Bahin Yojana) पैसे मिळाले नसतील, तर घाबरू नका. महाराष्ट्र शासनाने यासाठी काही पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.
✅ 181 हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करा
तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत? त्वरित 181 हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करून तक्रार नोंदवा. येथे तुमची समस्या समजून घेतली जाईल आणि तत्काळ निराकरण केले जाईल.
✅ नारी शक्ती दूत अॅप वापरा
सरकारने तक्रारींसाठी नारी शक्ती दूत’ अॅप मध्ये पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्याद्वारे तक्रार दाखल करा आणि तुमच्या अर्जाच्या स्थितीची माहिती मिळवा.
✅ अंगणवाडी केंद्रास भेट द्या
तुम्ही तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात जाऊन तक्रार नोंदवू शकता.
‘माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पैसे मिळण्यास उशीर का होतो?
काही वेळा बँक प्रक्रियेमध्ये तांत्रिक अडचणी येऊ शकतात. तसेच, खालील कारणांमुळे पैसे वेळेवर मिळत नाहीत:
▶ बँक खात्यात KYC अपडेट नसणे
▶ अर्जामध्ये दिलेली माहिती चुकीची असणे
▶ बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक नसणे
▶ सरकारी नियमांनुसार पात्रता नसणे
जर तुमच्या बाबतीत असे काही झाले असेल, तर वर दिलेल्या पर्यायांद्वारे तक्रार करा.
🔴 हेही वाचा 👉 पात्रता, कागदपत्रे आणि नवीन अर्ज प्रक्रिया जाणून घ्या! ऑनलाइन व ऑफलाइन.
‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ कोण घेऊ शकत?
✅ वयोगट: 21 ते 65 वर्षे
✅ वार्षिक उत्पन्न: 2.5 लाखांपेक्षा कमी
✅ कुटुंबात कोणीही सरकारी नोकरीत नसावे
✅ कुटुंबाने इनकम टॅक्स भरलेला नसावा
✅ चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळता) नसावे
✅ आधीच इतर सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नसावा
तुमच्या पैशांची खातरजमा करा!
जर तुमच्या खात्यात ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचे (Mazi Ladki Bahin Yojana) पैसे आले नाहीत, तर त्वरित 181 हेल्पलाइन, नारी शक्ती दूत अॅप किंवा अंगणवाडी केंद्राशी संपर्क साधा. तुमच्या तक्रारीवर लवकरच कारवाई केली जाईल आणि तुम्हाला तुमच्या हक्काची रक्कम मिळेल.
🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहिण योजना बनली मोठा आर्थिक भार, अनेक योजनांना आणि विकासकामांना अडचणी.