Ladki Bahin Yojana Ineligible Beneficiaries Maharashtra : महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजना छाननी प्रक्रियेबाबत मोठा खुलासा झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक महिला माझी लाडकी बहीण योजनेसाठी (Mazi Ladki Bahin Yojana) अपात्र ठरल्या आहेत.
मोठ्या संख्येने महिला अपात्र ठरल्या
महिला व बालविकास विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील ५ लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे. यातील १.६ लाख महिलांकडे चारचाकी वाहने असल्यामुळे अर्ज फेटाळण्यात आले. तसेच, २१ वर्षाखालील आणि ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या १.१० लाख अर्जदार अपात्र ठरले. पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांमध्ये मोठ्या संख्येने अर्ज बाद झाले आहेत.
राज्यातील ‘योजना नको’ अर्जांचा वाढता कल
सरकारी नियमांमुळे आणि कारवाईच्या भीतीने १.५ लाख महिलांनी स्वतःच योजना नको म्हणून अर्ज मागे घेतले आहेत. अधिकाऱ्यांच्या मते ही संख्या १० लाखांपर्यंत जाऊ शकते.
शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी सुरू
महिला व बालविकास विभागाला शेतकरी सन्मान योजनेतील २.३० लाख लाभार्थ्यांची यादी मिळाल्याने, त्यांना लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवण्यात आले. महाराष्ट्रातील ९४ लाख शेतकरी कुटुंबांची छाननी सुरू आहे.
आयकर यादीच्या प्रतीक्षेत सरकार
सरकार अजूनही अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या अर्जदारांची छाननी करत आहे. यासाठी प्राप्तिकर विभागाकडून माहिती मिळाल्यानंतर आणखी मोठ्या संख्येने अर्जदार अपात्र ठरू शकतात.
🔴 हेही वाचा 👉 आधी चारचाकी वाहन असलेल्या, आता ‘या’ लाडक्या बहिणींनाही लाभ मिळणार नाही.
महिलांनी पुढे काय करावे?
जर तुमच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर चारचाकी वाहन नसेल आणि जर तुम्ही ईतर निकष पूर्ण करत असाल, तर तुमच्यासाठी योजना सुरू राहील.
अपात्र ठरल्यास स्थानिक प्रशासनाकडून अधिक माहिती घ्यावी
लाडकी बहीण योजनेची (Majhi Ladki Bahin Yojana) छाननी प्रक्रिया अजून काही आठवडे सुरू राहणार आहे. अर्जदारांनी आपली कागदपत्रे तपासून योग्य ती माहिती सादर करावी.
🔴 हेही वाचा 👉 आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक करण्याची प्रक्रिया सुरू, घरबसल्या मोबाईलवरुन करा.