Eknath Shinde Sarkari Yojana Discontinued Mahayuti Tension : राज्यात महायुती सरकारवर (Mahayuti Government) तणाव वाढताना दिसत आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या तीन महत्त्वाच्या योजना बंद करण्याचा विचार सुरू आहे. ‘आनंदाचा शिधा’ (Anandacha Shidha) आणि ‘शिवभोजन थाळी’ (Shiv Bhojan Thali) या योजना बंद करण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली आहे. तसेच, उपमुख्यमंत्री शिंदे यांना आपत्ती व्यवस्थापन समितीमधूनही वगळण्यात आले आहे.
योजना बंद करण्याचा विचार का?
राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण वाढल्याने मोफत योजना बंद करण्याचा विचार केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवभोजन थाळी योजनेसाठी दरवर्षी 126 कोटींचा खर्च होतो. त्यामुळे खर्चाचे पुनरावलोकन करण्याची गरज असल्याचे भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
🔴 हेही वाचा 👉 दीड लाख लाभार्थी महिलांची माघार! जाणून घ्या संपूर्ण माहिती.
शिंदे गटाच्या आमदारांची भूमिका
Maharashtra Politics : शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले की, “मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना बंद होणार नाही. तसेच, शिंदे यांनी सुरू केलेल्या कोणत्याही योजनांवर गदा येणार नाही.” मात्र, आपत्ती व्यवस्थापन समितीतून वगळण्याबाबत त्यांना माहिती नसल्याचेही त्यांनी सांगितले.
महायुतीतील अंतर्गत तणाव वाढतोय?
शिवसेनेतील मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर कायम आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी त्यांच्या खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहून प्रशासनाच्या निर्णयांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. धोरणात्मक निर्णय प्रशासकीय स्तरावर घेतले जात असल्याने त्यांनी नाराजी दर्शवली आहे.
🔴 हेही वाचा 👉 लाखो लाडक्या बहिणी धोक्यात, राज्य सरकारकडून आयकर नोंदींची पडताळणी.
महायुतीत पुढे काय होणार?
एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाच्या (Sarkari Yojana Maharashtra) योजना बंद करण्याचा निर्णय झाला, तर त्यामुळे त्याचा शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीवर मोठा प्रभाव पडू शकतो. आगामी काळात महायुतीतील संबंध अधिक तणावपूर्ण होण्याची शक्यता आहे.
🔴 हेही वाचा 👉 नागपूरच्या हजारो महिलांचे अर्ज बाद! आता मिळणार नाही लाभ.