14 फेब्रुवारी 2025: Atal Pension Yojana Apply Benefits Monthly Pension – वृद्धापकाळात आर्थिक स्थैर्य हवे असेल, तर सरकारी पेन्शन योजना (Sarkari Pension Yojana) खूप उपयुक्त ठरू शकते. केंद्र सरकारच्या अटल पेन्शन योजनेत (Atal Pension Yojana 2025) सहभागी झाल्यास निवृत्तीनंतर दरमहा १ हजार ते ५ हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते.
अटल पेन्शन योजना काय आहे?
केंद्र सरकारने 2015 मध्ये अटल पेन्शन योजना सुरू केली आहे. 18 ते 60 वर्षे वयोगटातील नागरिक या योजनेसाठी अर्ज करू शकतात. यामध्ये मासिक योगदान करावे लागते आणि 60 वर्षांनंतर निश्चित पेन्शन मिळते.
पेन्शन रक्कम कशी ठरते?
- मासिक योगदानाच्या आधारे निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पेन्शनची रक्कम ठरते.
- उदाहरणार्थ, 18 व्या वर्षी योजनेत सहभागी झाल्यास दरमहा 210 रुपये भरल्यास 60 वर्षांनंतर 5000 रुपये पेन्शन मिळते.
- कमी योगदान भरल्यास 1000, 2000, 3000 किंवा 4000 रुपये पेन्शन मिळण्याची शक्यता असते.
🔴 हेही वाचा 👉 28 फेब्रुवारीनंतर ‘या’ शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळणे बंद.
अर्ज कसा करावा?
- जवळच्या बँकेच्या शाखेला भेट द्या.
- बँक अधिकाऱ्यांकडून योजनेबाबत माहिती घ्या.
- आपली ओळख व बँक खाते तपशील द्या.
- हवी असलेली पेन्शन योजना निवडा.
- अर्ज सबमिट करा आणि मासिक हप्ते भरण्यास सुरूवात करा.
🔴 हेही वाचा 👉 Free Cycle Scheme Maharashtra: या योजनेतून शालेय विद्यार्थ्यांना मिळणार मोफत सायकल.
योजनेचे फायदे
✔️ सरकारी हमी असलेली निवृत्ती वेतन योजना.
✔️ आर्थिक स्थैर्यासाठी हमीशीर पर्याय.
✔️ कमीत कमी गुंतवणुकीत चांगला परतावा.
✔️ बँकेद्वारे सोपी नोंदणी प्रक्रिया.
जर तुम्हाला वृद्धापकाळात आर्थिक अडचण येऊ नये असे वाटत असेल, तर अटल पेन्शन योजनेसाठी (Atal Pension Yojana) अर्ज करा आणि पेन्शनचा लाभ घ्या.
🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेचे 1500 सोडून अजून दरमहा 1500 रुपये मिळवा.