मुंबई, १५ फेब्रुवारी २०२५: Auto Rickshaw Taxi Drivers Pension Scheme Maharashtra – महाराष्ट्रातील टॅक्सी आणि ऑटो रिक्षा चालकांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी ‘निवृत्ती सन्मान योजना’ (Nivrutti Samman Yojana) जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत ६५ वर्षांवरील टॅक्सी आणि रिक्षा चालकांना १० हजार रुपयांचा सन्मान निधी दिला जाणार आहे.
आनंद दिघे साहेब यांच्या जयंतीनिमित्त महामंडळ स्थापन
२७ जानेवारी २०२५ रोजी आनंद दिघे साहेब यांच्या जयंतीनिमित्त राज्य सरकारने ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा, मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ’ स्थापन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून या महामंडळाची स्थापना करण्यात आली. यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मोठा निर्णय
राज्यात सुमारे ९ ते १० लाख ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक आहेत. हे चालक असंघटित क्षेत्रात काम करतात. त्यामुळे त्यांना सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी सरकारने हे महामंडळ स्थापन केले आहे. यामुळे भविष्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ (Government Schemes For Drivers) चालकांना मिळणार आहे.
नोंदणीसाठी वेब पोर्टल सुरू
राज्यभरातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना महामंडळाचे सदस्य होण्यासाठी ५०० रुपये नोंदणी शुल्क आणि ३०० रुपये वार्षिक वर्गणी भरावी लागेल. यासाठी ऑनलाइन नोंदणी पोर्टल सुरू करण्यात आले आहे. चालक स्वतःच्या मोबाईलवरूनही सहज नोंदणी करू शकतात.
‘निवृत्ती सन्मान योजना’ आणि इतर फायदे
- ६५ वर्षांवरील चालकांना १०,००० रुपये सन्मान निधी
- जीवन विमा आणि अपंग विमा योजना
- चालकांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना
- अपघात झाल्यास आर्थिक मदत
उत्कृष्ट चालकांसाठी बक्षीस योजना
राज्यातील उत्कृष्ट रिक्षा आणि टॅक्सी चालक, संघटना आणि स्टँडसाठी दरवर्षी पुरस्कार योजना राबवली जाणार आहे. यामुळे चालकांना प्रोत्साहन मिळेल, असे परिवहनमंत्री सरनाईक यांनी सांगितले.
(Taxi Auto Rickshaw Drivers Pension Scheme Maharashtra) ही योजना लाखो चालकांसाठी लाभदायक ठरणार आहे. लवकरच यासंबंधी अधिक माहिती महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल.
🔴 हेही वाचा 👉 8.40 लाख कुटुंबांचे वीज बिल झाले शून्य, तुम्हीही अशा प्रकारे मिळवू शकता लाभ.