ABY: मोफत उपचारासाठी पात्रता कशी तपासावी आणि कार्ड कसे बनवावे?

2 Min Read
Ayushman Bharat Yojana Eligibility Apply Online Offline 2025

Ayushman Bharat Yojana Eligibility Apply Online Offline 2025 : भारत सरकारच्या आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पात्र नागरिकांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतो. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. तुम्हीही तुमचे आयुष्मान कार्ड काढू शकता का? आणि ऑनलाइन-ऑफलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे ते जाणून घेऊयात…

आयुष्मान भारत योजनेत कोण पात्र आहेत?

एसईसीसी-२०११ (SECC-2011) डेटाबेस नुसार खालील लोक पात्र मानले जातात:

  • ग्रामीण भाग: गरीब, भूमिहीन मजूर, कच्च्या घरात राहणारे कुटुंब.
  • शहरी भाग: रिक्षाचालक, फेरीवाले, सफाई कर्मचारी, कामगार, बांधकाम कामगार.
  • बीपीएल (BPL) कुटुंब: आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील कुटुंबे.

🔴 हेही वाचा 👉 आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची संधी! UIDAI ने वाढवली अंतिम तारीख, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया.

पात्रता ऑनलाइन कशी तपासाल?

तुम्ही आयुष्मान भारत योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर (pmjay.gov.in) जाऊन पात्रता तपासू शकता:

  1. वेबसाइट उघडल्यावर “Am I Eligible” पर्यायावर क्लिक करा.
  2. तुमचा मोबाईल नंबर टाका आणि OTP व्हेरिफाय करा.
  3. राज्य, जिल्हा आणि शोधासाठी आधार कार्ड/रेशन कार्ड नंबर टाका.
  4. तुम्ही पात्र असाल, तर अर्ज करण्यासाठी पुढे जाऊ शकता.

आयुष्मान कार्ड कसे बनवाल?

ऑनलाइन प्रक्रिया:

  1. pmjay.gov.in वेबसाइटवर लॉगिन करा.
  2. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा.
  3. मंजुरी मिळाल्यानंतर तुमचे आयुष्मान कार्ड बनवले जाते त्यानंतर तुम्ही तुमचे आयुष्मान कार्ड डाउनलोड करू शकता.

.🔴 हेही वाचा 👉 धुणीभांडी, घरकाम करणाऱ्यांसाठी आहे ही सरकारी योजना; मिळतो आर्थिक लाभ, जाणून घ्या संपूर्ण माहिती.

ऑफलाइन प्रक्रिया:

  1. नजीकच्या CSC केंद्राला (कॉमन सर्व्हिस सेंटर) भेट द्या.
  2. अधिकारी तुमची पात्रता तपासतील आणि कागदपत्रांची पडताळणी करतील.
  3. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचे आयुष्मान कार्ड जारी केले जाते.

आयुष्मान कार्ड बनवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • मतदार ओळखपत्र
  • मोबाईल नंबर
  • बँक खाते तपशील

आयुष्मान कार्ड असलेल्या व्यक्तींना सरकारी व खासगी हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार मिळतो. हृदयरोग, कॅन्सर, किडनी ट्रान्सप्लांट यासारख्या महागड्या आजारांवरही मोफत उपचाराचा लाभ मिळतो. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा आणि आपले आयुष्मान कार्ड (Ayushman Card 2025) बनवून घ्यावे.

🔴 हेही वाचा 👉 आयुष्मान कार्डद्वारे कोणत्या आजारांवर मोफत उपचार मिळत नाही? जाणून घ्या.

Share This Article