मुंबई, 7 फेब्रुवारी 2025: Bandhkam Kamgar Bhandi Yojana 2025 – महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांसाठी मोठी घोषणा केली आहे. “बांधकाम कामगार भांडी योजना 2025” अंतर्गत पात्र कामगारांना मोफत भांडी संच दिला जाणार आहे. मागील 5 महिन्यांपासून बंद असलेली अर्ज प्रक्रिया आता पुन्हा सुरू करण्यात आली आहे. इच्छुक कामगारांना ऑनलाईन नोंदणी करून या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
कुणाला मिळेल लाभ?
- अर्जदार बांधकाम कामगार म्हणून अधिकृतपणे नोंदणीकृत असावा.
- महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे वैध नोंदणी असणे आवश्यक.
- फक्त नोंदणीकृत कामगारांनाच मोफत भांडी संच दिला जाणार आहे.
Bandhkam Kamgar Yojana अर्ज करण्याची प्रक्रिया
1) ऑनलाईन नोंदणी (जर आधी नोंदणी नसेल तर)
- अधिकृत वेबसाईट mahabocw.in वर जा.
- ‘Construction Worker: Registration’ या पर्यायावर क्लिक करा.
- आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर प्रविष्ट करून ‘Proceed to Form’ वर क्लिक करा.
- 1 रुपया ऑनलाइन पेमेंट करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
2) मोफत भांडी योजनेसाठी अर्ज (फक्त नोंदणीकृत कामगारांसाठी)
- ही योजना ऑफलाइन अर्ज प्रणालीवर आधारित आहे.
- अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जदाराच्या मोबाईलवर पुष्टीकरण संदेश येईल.
- अर्ज करणाऱ्या कामगारांना एकत्र बोलावले जाऊन आधार बायोमेट्रिक पडताळणी केली जाईल.
- पात्र असणाऱ्या अर्जदारांना मोफत भांडी संच वितरित केला जाईल.
महत्त्वाची माहिती
- योजनेचा लाभ घेण्यासाठी वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे.
- पात्रता नसलेल्या किंवा चुकीची माहिती देणाऱ्या अर्जदारांचा अर्ज नाकारला जाऊ शकतो.
- अर्जासंबंधी अधिक माहिती आणि अद्यतनांसाठी mahabocw.in वेबसाईटला भेट द्या.
बांधकाम कामगारांनी मोफत भांडी योजनेचा (Bandhkam Kamgar Bhandi Yojana 2025) लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी!
🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेतून 1 रुपयाही न मिळालेल्या महिलांसाठी सरकारचा मोठा निर्णय!.