तुमचा बांधकाम कामगार योजनेचा अर्ज मंजूर झाला की नाही? अस तपासा अर्जाच स्टेटस Bandhkam Kamgar Yojana 2025 Maharashtra

2 Min Read
Bandhkam Kamgar Yojana Application Status Check Maharashtra

Bandhkam Kamgar Yojana Application Status Check Maharashtra : महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी ‘बांधकाम कामगार योजना’ (Maharashtra Bandhkam Kamgar Yojana) एक महत्त्वाची सरकारी योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य दिले जाते. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने ही योजना सुरू केली असून, यासाठीची अर्ज प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक कामगारांनी या योजनेसाठी अर्ज केला होता, परंतु आचारसंहितेमुळे काही काळ योजनेला स्थगिती आली होती. आता एकदा पुन्हा योजनेस गती मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्जदारांनी त्यांचा अर्ज मंजूर झाला आहे की पेंडिंग, हे तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

बांधकाम कामगार योजनेच्या अर्जाचे स्टेटस कसे तपासावे?

अर्जदार बांधकाम कामगार योजनेचे अर्ज स्टेटस सहजपणे तपासू शकतात. त्यासाठी खालील पद्धती वापरा:

  1. गुगलवर “बांधकाम कामगार योजना” असे सर्च करा.**
  2. तुमच्या स्क्रीनवर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची अधिकृत वेबसाइट mahabocw.in दिसेल.
  3. या वेबसाइटवर “बांधकाम कामगार प्रोफाइल लॉगिन करा” या पर्यायावर क्लिक करा.
  4. नंतर, तुमचा आधार नंबर आणि अर्जासोबत दिलेला मोबाईल नंबर टाका आणि “Proceed To Form” वर क्लिक करा.
  5. तुमच्या अर्जाची संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसेल, ज्यात तुमचा अर्ज मंजूर झाला आहे की पेंडिंग आहे याची माहिती मिळेल.

या पद्धतीने तुम्ही तुमच्या अर्जाची सद्यस्थिती तपासू शकता.

🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेतील गैरप्रकार राज्य सरकारच्या निदर्शनास, केली जाणार कठोर कारवाई.

Share This Article