मुंबई, ९ फेब्रुवारी २०२५: Devendra Fadnavis Ladki Bahin Yojana Update – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांचा लाभ मिळतो. मात्र, काही महिलांनी निकष न पाळता हा लाभ घेतल्याचे आढळून आले आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, योजनेत कोणतेही नवीन निकष लागू करण्यात आले नाहीत. सरकारने कोणाकडूनही पैसे परत घेतले नाहीत आणि तशी कोणतीही योजना नाही. मात्र, नियमांचे उल्लंघन करून लाभ घेत असाल, तर तो बंद केला जाईल.
काही महिलांनी स्वतःहून लाभ घेणे बंद केले आहे. तसेच, अनेक महिलांनी स्वतः पैसे परत केले आहेत. सरकार जनतेच्या पैशांचे रक्षण करण्यासाठी आहे आणि नियमबाह्य लाभ घेणाऱ्या महिलांचा लाभ बंद करण्यात येणार आहे.
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली की, जुलै २०२४ मध्ये निर्गमित आदेशानुसार ५ लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे.
अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांची यादी
- संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी महिला – २.३० लाख
- वय ६५ वर्षांपेक्षा जास्त असलेल्या महिला – १.१० लाख
- कुटुंबाच्या नावावर चारचाकी वाहन असलेल्या, ईतर योजनेचा लाभ घेत असलेल्या व स्वेच्छेने योजना सोडणाऱ्या महिला – १.६० लाख
- एकूण अपात्र महिला – ५ लाख
महिलांकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत
सरकारने स्पष्ट केले आहे की, अपात्र ठरलेल्या महिलांना आतापर्यंत मिळालेला निधी परत करावा लागणार नाही. मात्र, जानेवारी २०२५ पासून त्यांना सन्मान निधी मिळणार नाही.
🔴 लेटेस्ट अपडेट 👉 सोन्याचा आजचा भाव (९ फेब्रुवारी २०२५).
योजना सुरूच राहणार, पण अपात्र महिलांचा लाभ थांबवला जाईल
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की, माझी लाडकी बहीण योजना (Mazi Ladki Bahin Yojana) बंद होणार नाही. पण, अपात्र लाभार्थ्यांचा लाभ थांबवण्यात येईल. जर तुम्ही पात्र असाल, तर योजना तुमच्यासाठी सुरूच राहील.
🔴 नोकरी 👉 बांधकाम कामगारांसाठी विविध आर्थिक मदतीच्या योजना, विलंब न करता करा ऑनलाईन अर्ज.