E-Kyc Mandatory Sanjay Gandhi Niradhar Yojana Benefits Stopped : महाराष्ट्र सरकारच्या संजय गांधी निराधार योजनेच्या (Sanjay Gandhi Niradhar Yojana 2025) लाभार्थींना ई-केवायसी पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. राज्यातील अनेक महिलांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यामुळे त्यांच्या मासिक अनुदानावर परिणाम होऊ शकतो.
🔴 हेही वाचा 👉 टॅक्सी आणि रिक्षा चालकांसाठी मोठी घोषणा! ‘निवृत्ती सन्मान योजना’ सुरू, १० हजार रुपयांचा लाभ.
मार्चपर्यंत अंतिम मुदत
ज्या लाभार्थींनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही अशा लाभार्थ्यांसाठी मार्च 2025 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. जर त्यांनी या कालावधीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर अनुदान थांबवण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
ई-केवायसी अनिवार्य का?
सरकारच्या सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये पारदर्शकता आणि अचूकता राखण्यासाठी आधार लिंक करणे आवश्यक आहे. संजय गांधी निराधार योजनेत दरमहा ₹600 अनुदान मिळते. मात्र, अनेक महिलांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले नाही, त्यामुळे त्यांना लाभ मिळण्यात अडथळा येत आहे.
प्रशासनाचे आवाहन
प्रशासनाचे लाभार्थी महिलांना त्वरित ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. ज्या महिलांनी आवश्यक कागदपत्रे तहसील कार्यालयात अद्याप जमा केलेली नाहीत, त्यांनी लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा अनुदान बंद होईल.
लाभार्थींनी काय करावे?
- आधार कार्ड बँक खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक करावे.
- तहसील कार्यालयात जाऊन ई-केवायसी प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी.
- मार्चपूर्वी प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर मासिक अनुदान मिळणार नाही.
महिलांसाठी महत्त्वाची सूचना!
संजय गांधी निराधार योजनेचा (Sanjay Gandhi Niradhar Yojana) लाभ सुरू ठेवण्यासाठी लाभार्थींनी वेळेत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा, त्यांचे अनुदान बंद होण्याची शक्यता आहे.
🔴 हेही वाचा 👉 शहरात राहणाऱ्या लोकांना मिळतो का लाभ? जाणून घ्या पात्रता आणि फायदे.