E Rickshaw Yojana Maharashtra Online Registration Started : महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी शासनाच्या वतीने ई-रिक्षा अनुदान योजनेअंतर्गत 3.75 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान जाहीर करण्यात आले आहे. या योजनेत हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणपूरक ई-रिक्षा किंवा फिरते दुकान रिक्षा खरेदीसाठी सहाय्य दिले जाणार आहे. अर्ज करण्यासाठी 6 फेब्रुवारी 2025 ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे.
योजनेसाठी पात्रता
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- किमान 40% अपंगत्वाचे प्रमाणपत्र आवश्यक.
- अर्जदाराचे वय 18 ते 55 वर्षे असावे.
- वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
- अर्जदाराकडे UDID प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
आवश्यक कागदपत्रे
ई-रिक्षा अनुदानासाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:
- अर्जदाराचा फोटो व स्वाक्षरी.
- दिव्यांगत्व प्रमाणपत्र.
- UDID प्रमाणपत्र.
- अधिवास व जातीचा दाखला.
- ओळखपत्र व बँक पासबुक स्कॅन केलेले पेज.
अर्ज कसा करायचा?
E Rickshaw Yojana 2025 Maharashtra Apply Online:
- वेबसाईटला भेट द्या: MSHFDC संकेतस्थळावर जा.
- सूचना वाचा: योजनेच्या अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचा.
- अर्ज भरा: कागदपत्रांसह ऑनलाइन फॉर्म सबमिट करा.
- पोच पावती मिळवा: अर्ज सबमिट केल्यानंतर पोच पावती डाउनलोड करा.
- अर्जाची प्रक्रिया 22 जानेवारी 2025 पासून सुरू झाली असून 2 फेब्रुवारी 2025 (E rickshaw yojana 2025 maharashtra last date) पर्यंत अर्ज करता येईल.
- योजनेच्या पात्रतेबाबत अधिक माहिती आणि मदतीसाठी MSHFDC संकेतस्थळावर दिलेला हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधा.
E Rickshaw Scheme Maharashtra ही योजना केवळ दिव्यांग व्यक्तींना व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत देण्यासाठी आहे. सर्वसामान्य व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
🔴 हेही वाचा 👉 जानेवारी २०२५ सन्मान निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा.