e-Shram Card Registration For Gig Workers : 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी ‘गिग वर्कर्स’साठी ई-श्रम पोर्टलवर नोंदणीची (e-Shram Registration) सुविधा उपलब्ध होणार असल्याची घोषणा केली. या सुविधेचा अंदाजे 1 कोटी ‘गिग वर्कर्स’ना फायदा होणार आहे.
गिग वर्कर्स’ म्हणजे कोण?
गिग वर्कर्स म्हणजे अस्थायी स्वरूपात काम करणारे कर्मचारी. उदा. दुकानातील कामगार, रिक्षाचालक, ड्रायव्हर, पंचर मेकॅनिक, पेपर टाकनारे, दूध टाकणारे, पशुपालक आणि झोमॅटो, स्विगी, फ्लिपकार्ट व अमेझॉनचे डिलिव्हरी बॉय यांचा समावेश होतो.
🔴 हेही वाचा 👉 सोन्याच्या किंमतीत तब्बल 2180 रुपयांची मोठी वाढ.
ई-श्रम कार्डसाठी नोंदणी कशी करावी?
गिग वर्कर्स ई-श्रम पोर्टलवर ऑनलाईन किंवा ऑफलाईन नोंदणी करू शकतात.
ई-श्रम कार्ड ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया
- eshram.gov.in वेबसाइटला भेट द्या.
- “Register on eShram” बटणावर क्लिक करा.
- आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका व कॅप्चा भरा.
- EPFO किंवा ESIC सदस्यत्वाबाबत विचारणा होईल, योग्य पर्याय निवडा.
- “Send OTP” वर क्लिक करून आलेला OTP टाका.
- 14 अंकी आधार क्रमांक टाका व नियम अटी स्वीकारा.
- “Submit” बटणावर क्लिक करा.
- नवीन फॉर्ममध्ये आपले नाव, जन्मतारीख, पत्ता, शिक्षण, बँक माहिती भरून “Consent” वर टिक करा.
- माहिती तपासून शेवटी सबमिट करा व ई-श्रम कार्ड डाउनलोड करून प्रिंटआउट घ्या.
🔴 हेही वाचा 👉 महाराष्ट्र पोलीस भरती 2025: 10,000 पदांसाठी मेगा भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार!.
ई-श्रम कार्डचे फायदे
- सरकारी योजनांचा लाभ.
- विमा संरक्षण.
- भविष्यातील पेन्शन व सबसिडी योजनांचा लाभ.
गिग वर्कर्ससाठी (E Shram Card For Gig Workers) हे ई-श्रम कार्ड खूप फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर नोंदणी करा!
🔴 हेही वाचा 👉 रेपो रेट कपातीनंतर मोठा निर्णय, गृहकर्ज आणि वाहन कर्जावरील ईएमआय कमी होणार.