E Shram Portal Registration Benefits 2025 : केंद्र सरकारच्या ई-श्रम पोर्टल वर आतापर्यंत ३०.५८ कोटी असंघटित क्षेत्रातील कामगारांनी नोंदणी केली आहे. या पोर्टलवर नाव नोंदवल्यास कामगारांना अनेक फायदे मिळतात. अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबाला २ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. तसेच, अपघातामुळे अपंगत्व आल्यास १ लाख रुपयांपर्यंत मदत मिळते. (e-Shram Portal provides financial security to gig workers. Families get ₹2 lakh in case of death, ₹1 lakh for disability. Know benefits and registration process here).

गीग कामगारांसाठी मोठा फायदा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात गीग कामगारांसाठी मोठी घोषणा केली होती. ई-श्रम पोर्टलवर गीग वर्कर्सना नोंदणी करण्याची सुविधा देण्यात आली आहे. याचा डिलिव्हरी बॉय, ऑटो चालक, ड्रायव्हर, पंक्चर दुरुस्ती करणारे, मेंढपाळ, दुग्ध उत्पादक शेतकरी, पेपर विक्रेते यांना मोठा फायदा होणार आहे.
ई-श्रम कार्ड नोंदणीचे फायदे
- अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबाला २ लाख रुपये मदत
- अपघातात अपंग झाल्यास १ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत
- सरकारच्या भविष्यातील योजनांचा लाभ मिळण्याची संधी
- आर्थिक सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारची मदत
ई-श्रम पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी कशी करावी?
- eshram.gov.in वेबसाइटला भेट द्या.
- Register on e-Shram बटणावर क्लिक करा.
- आधार लिंक केलेला मोबाईल नंबर व कॅप्चा कोड टाका.
- EPFO किंवा ESIC सदस्यत्वाबाबत माहिती द्या.
- मोबाईल OTP टाकून १४ अंकी आधार क्रमांक सबमिट करा.
- नाव, पत्ता, शिक्षण, बँक माहिती भरून नोंदणी पूर्ण करा.
- कार्ड डाउनलोड करून प्रिंटआउट घ्या.
🔴 व्हिडिओ पहा 👉 लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण, पहा व्हिडीओ.
ऑफलाइन नोंदणी कशी करावी?
जर तुम्हाला ऑनलाइन नोंदणी करता येत नसेल, तर जवळच्या CSC केंद्रावर जा.
- आधार कार्ड, आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर आणि बँक खात्याची प्रत सोबत घ्या.
- CSC ऑपरेटर तुमची नोंदणी करून देईल.
नोंदणी करण्यास करू नका उशीर!
ई-श्रम कार्डधारकांना (E Shram Card 2025) भविष्यात केंद्र सरकारच्या विविध योजनांचा थेट लाभ मिळू शकतो. त्यामुळे सुरक्षित भविष्यासाठी आजच नोंदणी करा!
🔴 हेही वाचा 👉 येत्या 10 महिन्यात सोन्याची किंमत किती वाढेल? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत.