Ladki Bahin Yojana 2100 Rupees: फेब्रुवारीतच महिलांना मिळणार १५०० ऐवजी २१०० रुपये? जाणून घ्या सविस्तर

3 Min Read
Ladki Bahin Yojana 1500 To 2100 Rupees Update

Ladki Bahin Yojana Latest Update: महाराष्ट्रातील महिलांसाठी महत्त्वाची असलेली माझी लाडकी बहीण योजना मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे. सध्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत दिली जात आहे. मात्र, महाराष्ट्रातील महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी महिलांना २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे अनेक महिलांना २१०० रुपये कधी मिळणार? असा प्रश्न पडला आहे. फेब्रुवारी महिन्यात लाडकी बहीण योजनेचा वाढीव हफ्ता मिळेल का? की मार्चमध्ये राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली जाईल? जाणून घ्या संपूर्ण माहिती.

लाडकी बहीण योजनेचे २१०० रुपये कधी मिळतील?

Mazi Ladki Bahin Yojana 2100 Rupees : राज्य सरकारच्या मार्च महिन्यातील अर्थसंकल्पात महिलांना २१०० रुपये देण्याचा निर्णय होऊ शकतो. १ फेब्रुवारी २०२५ रोजी देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर होईल, मात्र लाडकी बहीण योजनेसाठी निधी राज्य सरकारतर्फे दिला जातो, त्यामुळे केंद्र सरकारच्या बजेटमध्ये याबाबत कोणतीही घोषणा होणार नाही. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये महिलांना २१०० रुपये मिळण्याची शक्यता कमी आहे.

राज्य सरकारचा अर्थसंकल्प मार्च २०२५ मध्ये मांडला जाणार आहे. यामध्ये राज्याचे अर्थमंत्री अजित पवार महिलांना २१०० रुपये देण्याबाबतची घोषणा करू शकतात. जर राज्य सरकारने याला मंजुरी दिली, तर पुढील महिन्यापासून लाडकी बहीण योजनेतुन महिलांना १५०० ऐवजी २१०० रुपये मिळू शकतात.

🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजना अपात्र महिलांची यादी जाहीर – त्वरित तपासा आपले नाव!.

लाडकी बहीण योजनेचा लाभ कोणाला मिळणार नाही?

लाडकी बहीण योजनेसाठी काही पात्रता निकष ठरवण्यात आले आहेत. जर कोणी हे निकष पूर्ण करत नसेल, तर त्यांना पुढचा हप्ता मिळणार नाही.

✔ महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असावी.
✔ महिलांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावे.
✔ सरकारी विभागात नोकरी करणाऱ्या महिलांना लाभ मिळणार नाही.
✔ महिलेने इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नसावा
✔ माहीलेच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळता) नसावे.

महिलांसाठी मोठी घोषणा कधी होणार?

Ladki Bahin Yojana 1500 To 2100 Update: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) हफ्त्याच्या रकमेतील वाढ हा महिलांसाठी महत्त्वाचा निर्णय असणार आहे. सध्या महिलांना १५०० रुपये मिळत आहेत, मात्र मार्च २०२५ मध्ये राज्य सरकार अर्थसंकल्पात २१०० रुपये देण्याची घोषणा करू शकते. त्यामुळे महिलांना अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा! परराज्यातील 1171 बोगस अर्जांचा पर्दाफाश.

Share This Article