Ladki Bahin Yojana 2100 Rupees: २१०० रुपये हफ्त्याचा निर्णय कधी? अजित पवारांनी दिले महत्त्वाचे संकेत!

2 Min Read
Ladki Bahin Yojana 2100 Rupees Ajit Pawar Update

मुंबई, २ फेब्रुवारी २०२५: महाराष्ट्रातील महिलांसाठी महत्वाची बातमी! महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेसाठी (Ladki Bahin Yojana Maharashtra) पात्र महिलांना २१०० रुपये दरमहा देण्याचे आश्वासन दिले होते. सध्या या योजनेअंतर्गत महिलांना १५०० रुपये प्रतिमहिना दिले जात आहेत. मात्र, आता या हफ्त्यात वाढ करण्यासंदर्भात राज्य सरकारने महत्त्वाचे संकेत दिले आहेत. (Ladki Bahin Yojana: Maharashtra govt may increase financial aid to ₹2100 per month. Ajit Pawar hints at a decision after the Maharashtra budget in March 2025).

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केले की मार्च महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्राचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2025) सादर केला जाईल. त्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या हफ्त्याची रक्कम २१०० रुपये करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

कधी लागू होणार वाढीव हफ्ता?

अर्थसंकल्पानंतर या निर्णयाची अंमलबजावणी होईल, असे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील महिलांना लवकरच या निर्णयाचा लाभ मिळू शकतो. सरकार हा वाढीव हफ्ता मागील महिन्यांपासून लागू करणार की नव्या महिन्यापासून हे सुद्धा अर्थसंकल्पानंतर स्पष्ट होईल.

🔴 हेही वाचा 👉 बजेटनंतर दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचा सोन्याचा दर 2 फेब्रुवारी 2025.

लाडकी बहीण योजनेच्या प्रमुख बाबी:

✅ सध्याचा हफ्ता: १५०० रुपये प्रति महिना
✅ वाढ होण्याची शक्यता: २१०० रुपये प्रति महिना
✅ अंमलबजावणीची शक्यता: मार्च २०२५ नंतर
✅ शासनाच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

महिलांसाठी आर्थिक मदतीचे हे मोठे पाऊल असून, राज्य सरकारच्या आगामी अर्थसंकल्पातून यासंबंधी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनी आता सरकारच्या पुढील निर्णयाकडे लक्ष ठेवायला हवे!

🔴 हेही वाचा 👉 मध्यमवर्गीय, महिला, शेतकरी आणि युवा वर्गासाठी दिलासादायक घोषणा.

Share This Article