Ladki Bahin Yojana: आधी चारचाकी वाहन असलेल्या, आता ‘या’ लाडक्या बहिणींनाही लाभ मिळणार नाही?

2 Min Read
Ladki Bahin Yojana 5 Acre Land Benefit Exclusion

मुंबई, १० फेब्रुवारी २०२५: Ladki Bahin Yojana 5 Acre Land Benefit Exclusion – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची तपासणी सुरू केली आहे. योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यात येत होते. मात्र, आता सरकार नवीन निकष लागू करत आहे. त्यामुळे लाखो महिलांची नावे योजनेतून वगळली जात आहेत. (Maharashtra govt updates Ladki Bahin Yojana! Women with over 5 acres of land now ineligible. Check new rules, eligibility, and impact on beneficiaries).

  • सरकारने आधीच चारचाकी वाहन असलेल्या लाभार्थ्यांची तपासणी सुरु केली आहे.
  • आता पुढच्या टप्प्यात ५ एकरपेक्षा जास्त शेती असलेल्या कुटुंबांची पडताळणी केली जाणार आहे.
  • ज्या महिलांच्या कुटुंबाकडे ५ एकरपेक्षा जास्त शेती असेल, त्यांचे अर्ज बाद केले जातील.
  • लाडकी बहीण योजना गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी आहे.
  • या योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे हा मुख्य उद्देश आहे.
  • निकष पाळणाऱ्या लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ मिळावा, म्हणून सरकारने कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

🔴 हेही वाचा 👉 चोरी झालेला स्मार्टफोन ट्रॅक आणि ब्लॉक करण्यासाठी आता सरकारी सुविधा, घरबसल्या ट्रॅक करा.

परिणाम आणि प्रतिक्रिया

  • या निर्णयामुळे अंदाजे 20 लाख महिलांना योजनेतून वगळले जाईल.
  • काही लाभार्थ्यांनी स्वेच्छेनं अर्ज मागे घेतले आहेत.
  • सरकारचे हे पाऊल योग्य लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी आहे आहे.

महत्त्वाचे मुद्दे

  • अर्ज पडताळणीच्या प्रक्रियेत येणाऱ्या नवीन निकषांनुसार बदल होणार आहेत.
  • कुटुंबाची आर्थिक स्थिती आणि शेतीची जमीन तपासली जाणार आहे.

माझी लाडकी बहीण (Mazi Ladki Bahin Yojana) योजनेअंतर्गत योग्य लाभार्थ्यांनाच लाभ मिळावा यासाठी नवीन निकष लागू करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे ५ एकरपेक्षा जास्त शेती आहे, त्यांचे अर्ज बाद केले जातील.

🔴 हेही वाचा 👉 येत्या 10 महिन्यात सोन्याची किंमत किती वाढेल? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत.

Share This Article