Ladki Bahin Yojana 8th Installment Date Maharashtra : महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने संदर्भात (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) मोठी अपडेट समोर आली आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात 8वा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, 15 फेब्रुवारी 2025 रोजी पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले जाऊ शकतात. मात्र, सर्व महिलांना हा हप्ता मिळणार नाही.
या महिलांना मिळणार नाही 8वा हप्ता
राज्य सरकारने नुकतीच एक यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये अपात्र लाभार्थींना योजनेतून वगळण्यात आले आहे. याचा अर्थ, काही महिलांना यापुढे 1500 रुपयांचा आर्थिक लाभ मिळणार नाही.
कोणत्या महिलांना हप्ता मिळणार नाही?
- ज्या महिलांनी पात्रतेची अट पूर्ण केलेली नाही.
- ज्या महिलांचे बँक खाते DBT (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) साठी सक्षम नाही.
- आधार कार्ड आणि मोबाईल नंबरशी लिंक नसलेली खाती.
- महाराष्ट्राच्या बाहेर राहणाऱ्या किंवा स्थलांतरित झालेल्या महिला.
🔥 हेही वाचा 👉 महिलांसाठी सरकारने सुरु केली आहे लखपती दीदी योजना, अर्ज करण्यासाठी लागतात फक्त ही कागदपत्र.
लाडकी बहिण योजनेचे पात्रता नियम तपासा
लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी पूर्ण करणे गरजेचे आहे:
✔ महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी.
✔ वय 21 ते 65 वर्षांदरम्यान असावे.
✔ आधार लिंक असलेले बँक खाते असणे आवश्यक..
✔ रविवासी पुरावा, आधार कार्ड आणि बँक स्टेटमेंट आवश्यक.
🔴 हेही वाचा 👉 महिलांसाठी उत्कृष्ट संधी, ही योजना बनवेल फक्त 2 वर्षांत महिलांना लखपती.
महिला लाभार्थींनी काय करावे?
जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या 8व्या हप्त्याची वाट पाहत असाल, तर तुमच्या बँक खात्याची स्थिती तपासा. DBT सुविधा सुरु आहे का, याची खात्री करा. लाभ मिळाला नाही, तर नजीकच्या CSC केंद्रात चौकशी करा.
🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेसारख्या मोठ्या योजनांसाठी सरकारकडे निधी आहे, मात्र….
माझी लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना आर्थिक मदत करून स्वावलंबी बनवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र, अनधिकृत लाभार्थींना योजनेतून वगळण्यासाठी सरकार पात्रतेची तपासणी करत आहे.
लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता (Majhi Ladki Bahin Yojana February Installment Date) 15 फेब्रुवारीपर्यंत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाभार्थींनी आपली पात्रता तपासून बँक खात्याशी संबंधित माहिती अपडेट ठेवावी.
🔴 लेटेस्ट अपडेट 👉 सोन्याचा आजचा भाव 11 फेब्रुवारी 2025.