Ladki Bahin Yojana Bachchu Kadu Demand Election Commission Inquiry : विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) आता अडचणीत आली आहे. निवडणुकीपूर्वी योजना लागू करून लाभार्थ्यांना पैसा वाटला गेला, पण आता सरकारने योजनेचे निकष बदलले आहेत. यावरून प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष, (Prahar Janshakti Party) माजी राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी आक्षेप घेतला आहे.
बच्चू कडू म्हणाले की, निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण योजनेत कोणताही निकष लागू केला नव्हता, परंतु आता निकष लागू केले जात आहेत. ‘माझी लाडकी बहिण’ योजनेसाठी (Mazi Ladki Bahin Yojana) पात्र असलेल्या महिलांना आता योजनेचे लाभ मिळणार नाहीत, असा आरोप बच्चू कडू यांनी केला.
त्यांनी त्यावरून सरकारच्या धोरणाची चांगलीच समालोचना केली. ‘प्रत्येक शेतकऱ्याला सोयाबीन हमीभावापेक्षा २ हजार रुपये कमी किमतीत विकावे लागले, आणि इतर शेतमालाची स्थितीही अशीच आहे. दुसरीकडे, ‘लाडकी बहिण’ योजनेसाठी कोट्यावधी रुपये उधळले जात आहेत, हे चुकीचे आहे,’ अस ते म्हणाले.
लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेसाठी अडीच लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे, तर चारचाकी वाहन असलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. आता सरकारने आयकर विभाग आणि परिवहन विभागाकडून माहिती घेऊन अर्जांची पडताळणी सुरू केली आहे.
बच्चू कडू यांनी निवडणुकीनंतर लाडकी बहिण योजनेचे निकष बदलण्यावरून निवडणूक आयोगाकडे चौकशी करण्याची मागणी केली आहे. निवडणुकीच्या फायद्यासाठी मोठ-मोठ्या घोषणा करणे, आणि काम झाल्यावर निकष बदलून जनतेची फसवणूक करणे यावर नियंत्रण असले पाहिजे अस बच्चू कडू म्हणाले.
बच्चू कडू यांच्या आरोपानुसार, सरकारने लाडकी बहिण योजनेच्या पात्रतेत बदल करून सामान्य महिलांची फसवणूक केली आहे.
🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेतून 1 रुपयाही न मिळालेल्या महिलांसाठी सरकारचा मोठा निर्णय.