Ladki Bahin Yojana Beneficiaries Reduced 2025 : महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. डिसेंबर २०२४ मध्ये २.४६ कोटी महिला या योजनेचा लाभ घेत होत्या. मात्र, जानेवारी २०२५ मध्ये ही संख्या कमी होऊन २.४१ कोटींवर आली आहे. म्हणजेच एका महिन्यात ५ लाख महिलांना यादीतून वगळण्यात आले आहे.
लाभार्थ्यांची संख्या कमी का झाली?
राज्य सरकारकडून सुरू असलेल्या पडताळणीमुळे अनेक महिलांना योजनेतून बाहेर काढण्यात आले आहे. याची प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत –
1️⃣ वयोमर्यादा: ६५ वर्षांवरील महिला योजनेसाठी अपात्र ठरवल्या आहेत.
2️⃣ दुसऱ्या योजनांचा लाभ: संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळणाऱ्या सुमारे २ लाख महिलांची नावे यादीतून काढण्यात आली आहे.
3️⃣ दुहेरी लाभ: लाभार्थ्यांना १५०० रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळू शकत नाही. त्यामुळे इतर योजनांमधून समान रक्कम मिळाल्यास त्यांना योजनेतून वगळण्यात येत आहे.
पुढच्या टप्प्यात कोण अपात्र ठरणार?
राज्य सरकार ५ महत्त्वाच्या निकषांवर लाभार्थ्यांची तपासणी करत आहे. अपात्र ठरणाऱ्या महिलांना योजनेतून काढले जाईल. ते निकष पुढीलप्रमाणे –
✅ वार्षिक कौटुंबिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त असल्यास
✅ महाराष्ट्रातील कायमस्वरूपी रहिवासी पुरावा नसल्यास
✅ आधार व बँक खाते तपशील जुळत नसल्यास
✅ चारचाकी वाहन असल्यास
✅ सरकारी नोकरी असल्यास
🔴 हेही वाचा 👉 महिलांचे फोटो लावून पुरुषांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ? असा उघडकीस आला गैरप्रकार.
सरकारसमोरील मोठे आर्थिक आव्हान
महाराष्ट्र सरकारने निवडणुकीपूर्वी अनेक कल्याणकारी योजना सुरु केल्या आहेत. मात्र, यामुळे ७.८ लाख कोटी रुपयांचे कर्ज वाढले आहे. त्यामुळे, राज्य सरकार खर्च कपात करण्यासाठी योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यावर भर देत आहे.
मंत्री अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी याआधीच सांगितले होते की, माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mazi Ladki Bahin Yojana) लाभार्थी महिलांची काटेकोरपने पडताळणी केली जाईल. आतापर्यंत सुमारे ५,००० हून अधिक महिलांनी स्वयंघोषणा करून स्वतःला अपात्र घोषित केले आहे.
🔴 येथे वाचा 👉 ‘या’ महिलांचा हप्ता बंद, तर पात्र महिलांना नियमित मदत – अदिती तटकरे.
सरकारच्या या निर्णयावर महिलांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही महिला निर्णयाचे समर्थन करत असल्या तरी, अनेक जणींनी आर्थिक मदतीत कपात केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
🔴 हेही वाचा 👉 सोन्याचा आजचा भाव (7 फेब्रुवारी 2025).