Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना बंद होणार? महिला आणि विरोधक आक्रमक, सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला इशारा

2 Min Read
Ladki Bahin Yojana Beneficiary Disqualification Sudhir Mungantiwar Warning

Ladki Bahin Yojana Beneficiary Disqualification Sudhir Mungantiwar Warning : राज्यातील महत्त्वाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारने आतापर्यंत तब्बल ५ लाख लाभार्थींना अपात्र ठरवले आहे. या निर्णयावर आता जोरदार राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे – “लाडकी बहीण योजना बंद करण्याचा विचार या जन्मात तरी आणू नये!”

महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी निवडणुकीपूर्वी माझी लाडकी बहीण योजना (Mazi Ladki Bahin Yojana) सुरू केली. या योजनेमुळे अनेक महिलांना दरमहा १५०० रुपयांचा आर्थिक लाभ मिळत होता. डिसेंबर २०२४ मध्ये २.४६ कोटी महिलांना हा लाभ मिळाला. मात्र, सरकारच्या नव्या निर्णयानुसार ५ लाख लाभार्थींना अपात्त्र ठरवण्यात आले असून, आता ही लाभार्थी महिलांची संख्या २.४१ कोटींवर आली आहे.

महिला आणि विरोधक आक्रमक

लाडकी बहीण योजनेतील अपात्र ठरलेल्या महिलांनी हा निर्णय अन्यायकारक असल्याचे सांगितले आहे. विरोधी पक्षांनीही सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. “महिला मतदारांसाठी ही योजना गेमचेंजर ठरली होती. आता त्याच महिलांना सरकार अपात्र ठरवत आहे,” असा आरोप विरोधक करत आहेत.

🔴 हेही वाचा 👉 कुटुंबाला मिळते २ लाखांची मदत! ई-श्रम पोर्टल नोंदणीचे ‘हे’ फायदे; आता डिलिव्हरी बॉयनाही लाभ.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारलाच धारेवर धरले आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले –

“लाडकी बहीण योजना सुरू करताना सर्व निकष जाहीर झाले होते. आता अचानक अपात्र ठरवणे चुकीचे आहे. लोकांचा सरकारवरील विश्वास उडेल. सरकारने ही योजना बंद करण्याचा विचार या जन्मात तरी करू नये.”

🔴 हेही वाचा 👉 येत्या 10 महिन्यात सोन्याची किंमत किती वाढेल? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत.

सरकारचा निर्णय योग्य की चुकीचा?

सरकारच्या मते, अनेक लाभार्थींनी निकष पूर्ण केलेले नाहीत. त्यामुळे त्यांची पडताळणी केली जात आहे. मात्र, अनेक महिलांचे पैसे अडकले आहेत. यामुळे लाभार्थींमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

जर कुणाला पात्र असूनही त्यांचे नाव चुकीने अपात्र ठरले आहे असे वाटत असेल, तर त्या स्थानीय तहसील कार्यालयात किंवा जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करू शकतात.

🔴 व्हिडिओ पहा 👉 लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण, पहा व्हिडीओ.

Share This Article