Ladki Bahin Yojana Beneficiary List Update: दीड लाख लाभार्थी महिलांची माघार! जाणून घ्या संपूर्ण माहिती

2 Min Read
Ladki Bahin Yojana Beneficiary List Update 2025

मुंबई, 10 फेब्रुवारी 2025: Ladki Bahin Yojana Beneficiary List Update 2025 – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) लाभार्थी महिलांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, दीड लाख महिलांनी स्वतःहून योजनेतून माघार घेतली आहे.  

का घेतली महिलांनी माघार?

राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाने लाभार्थ्यांची छाननी सुरू केली आहे. विविध निकष तपासल्यानंतर काही महिलांना ही योजना लागू होत नाही, असे स्पष्ट झाले. काही महिलांनी स्वेच्छेने या योजनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यामागची काही प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत –  

  • संबंधित महिलेच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर चार चाकी वाहन असल्यास.  
  • त्या महिला नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असल्यास.  
  • 2.30 लाख महिला संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असल्याने त्यांचे नाव वगळले.  
  • 1.10 लाख महिलांचे वय 65 वर्षांपेक्षा अधिक झाल्याने त्यांना अपात्र ठरवले.  

🔴 हेही वाचा 👉 ‘या’ जिल्ह्यांमध्ये मोठ्या संख्येने अर्ज बाद! छाननी प्रक्रिया अजून काही आठवडे सुरू.

अपात्र महिलांकडून सरकार पैसे परत घेणार नाही!

महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी स्पष्ट केले की, योजनेअंतर्गत अपात्र ठरलेल्या महिलांकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत. मात्र, त्यांना अपात्र ठरलेल्या महिलांना इथून पुढचे हप्ते मिळणार नाहीत. सरकारच्या या निर्णयामुळे आणखी काही महिला योजनेतून बाहेर पडू शकतात.  

🔴 हेही वाचा 👉 १५,००० रुपये + रोज ५०० रुपये मानधन + ट्रेनिंगसह मिळणार अनेक लाभ.

महिला सशक्तीकरणासाठी मोठे पाऊल

राज्य सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी माझी लाडकी बहीण योजना (Mazi Ladki Bahin Yojana) सुरू केली होती. आता छाननी प्रक्रियेमुळे अपात्र लाभार्थ्यांना योजनेतून वगळले जात आहे. त्यामुळे आता फक्त गरजू महिलांनाच या योजनेचा खरा लाभ मिळेल. 

🔴 हेही वाचा 👉 सोन्याचा आजचा भाव 10 फेब्रुवारी 2025.

Share This Article