Ladki Bahin Yojana Beneficiary Removal 2025 Aditi Tatkare : महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. या योजनेतून ५ लाख महिलांना अपात्र ठरवत वगळण्यात आल आहे.
![Ladki Bahin Yojana latest news today](https://sarkarinewsmarathi.in/wp-content/uploads/2025/02/1000014974-1600x1245.jpg)
या महिलांना मिळणार नाही लाभ
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी ट्वीटद्वारे ही माहिती दिली. शासन निर्णयानुसार, खालील महिलांना योजनेतून वगळण्यात आल आहे:
- संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी महिला – २,३०,०००
- वय ६५ वर्षांपेक्षा जास्त असलेल्या महिला – १,१०,०००
- चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी व स्वेच्छेने नाव मागे घेणाऱ्या महिला – १,६०,०००
एकूण ५ लाख महिलांना योजनेतून बाहेर काढण्यात आल आहे. सरकारन स्पष्ट केल आहे की, पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत राहणार आहे.
२१०० रुपये कधी मिळणार?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेचा लाभ १५०० रुपयांवरून २१०० रुपये करण्याच आश्वासन दिल होत. त्यामुळे २१०० रुपये कधी मिळणार? हा प्रश्न महिलांना सतावत आहे.
सूत्रांनुसार, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे. तसेच, अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर २१०० रुपये देण्याबाबत निर्णय होऊ शकतो.
माझी लाडकी बहीण योजनेतून (Mazi Ladki Bahin Yojana) वगळण्यात आलेल्या महिलांनी काय कराव?
जर तुम्ही पात्र असतानाही चुकून तुमच नाव या योजनेतून वगळल गेल असेल, तर तुम्ही आपल्या नजीकच्या महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकता. तसेच, शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरही तपशील तपासता येईल.
सरकारचा महत्त्वाचा निर्णय
सरकारन स्पष्ट केल आहे की, फक्त पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Scheme) लाभ मिळेल. त्यामुळे अपात्र लाभार्थ्यांची छाननी करून त्यांना योजनेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.