Ladki Bahin Yojana 2025: लाडकी बहीण योजना फसवणूक? यादीतून लाखो महिलांची नावे गायब!

2 Min Read
Ladki Bahin Yojana Controversy Mahayuti 2025

मुंबई | 12 फेब्रुवारी 2025: Ladki Bahin Yojana Controversy Mahayuti 2025 – महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेली ही योजना आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. योजनेतील लाभार्थ्यांची संख्या घटल्यामुळे विरोधकांनी महायुती सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत महायुतीच्या नेत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

यादीतून लाखो महिलांची नावे गायब!

विधानसभा निवडणुकीच्या काळात सरकारने अर्ज केलेल्या सरसकट सर्वच महिलांच्या खात्यात निधी वर्ग केला होता. मात्र, निवडणुकीनंतर सरकारने अपात्र लाभार्थ्यांची छाननी केली आणि लाखो महिलांची नावे यादीतून (Ladki Bahin Yojana List February 2025) वगळली. डिसेंबर 2024 मध्ये 2.46 कोटी महिला पात्र होत्या, परंतु आता हा आकडा 2.41 कोटींवर आला आहे.

🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहिन योजना 8वा हफ्ता अंतिम यादी जारी | Majhi Ladki Bahin Yojana 8th Installment Approved List.

मतदारांना लाच?

राजू शेट्टी यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. “लाडकी बहीण, आनंदाचा शिधा आणि इतर योजना या केवळ निवडणुकीसाठी मतदारांना दिलेली लाच होती,” असे शेट्टी म्हणाले. सरकारने करदात्यांच्या पैशांचा गैरवापर करून मतदारांना फसवल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

गुन्हे दाखल करण्याची मागणी

“राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असताना देखील महायुती सरकारने निवडणुकीसाठी लोकांची फसवणूक केली,” असा आरोप शेट्टी यांनी केला. त्यामुळे या प्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि मंत्र्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

🔴 हेही वाचा 👉 केवळ 5 वर्षांत धन दुप्पट, मिळवा हमी परतावा!.

सरकारची काय भूमिका?

महायुती सरकारने याप्रकरणी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, विरोधकांनी सरकारवर माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mazi Ladki Bahin Yojana) गैरव्यवहाराचे आरोप करत दबाव वाढवला आहे. आता सरकार या आरोपांना कशा प्रकारे उत्तर देणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

🔴 हेही वाचा 👉 या सरकारी योजनेतून पती-पत्नीस मिळतात दरमहा 9,250 रुपये, कसे? येथे जाणून घ्या.

Share This Article