Ladki Bahin Yojana February Installment Date: राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) पात्र महिलांना सध्या दरमहा 1500 रुपये देण्यात येत आहेत. आता लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
लाडकी बहिण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार?
विधानसभा निवडणुकीपूर्वी जुलै २०२४ मध्ये ‘लाडकी बहिण योजना’ सुरू करण्यात आली आणि काही काळातच ही एक राज्यातील महत्त्वाची योजना बनून लोकांसमोर आली. या योजनेअंतर्गत, महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होतात. 24 ते 26 जानेवारी दरम्यान लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता पात्र महिलांना दिला गेला. आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता (Ladki Bahin Yojana 8th Installment) १५ तारखेनंतर मिळण्याची शक्यता आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण सात हप्त्यांची रक्कम 10,500 रुपये महिलांच्या खात्यात जमा झाली आहे. दर महिन्याच्या १५ तारखेनंतर हप्त्याचे वितरण सुरू होत असते, त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता १५ तारखेनंतर महिलांच्या खात्यात जमा होईल असा अंदाज आहे.
२१०० रुपये?
मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार, महायुती सरकार पुन्हा विजयी झाल्यास महिलांना १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये दिले जाणार आहेत. नवीन अर्थसंकल्पात या बद्दलची घोषणा होईल आणि त्यानंतर नव्या आर्थिक वर्षापासून (मार्च 2025) महिलांच्या खात्यात २१०० रुपये जमा होऊ शकतात.
🔴 हेही वाचा 👉 २१०० रुपये हफ्त्याचा निर्णय कधी? अजित पवारांनी दिले महत्त्वाचे संकेत.
महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
लाडकी बहिण योजनेसंदर्भात काही चुकीची माहिती पसरवली जात आहे की अपात्र महिलांकडून रक्कम परत जमा करण्याची सक्ती केली जात आहे. यावर महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांनी स्पष्ट केले की, अशी कोणतीही घोषणा सरकारकडून करण्यात आलेली नाही. महिलांच्या खात्यात जमा केलेले पैसे पुनर्वसूलीचा कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही.
तुम्ही जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल, तर (Ladki Bahin Yojana February Installment) १५ तारखेनंतर तुमच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होईल.
🔴 लेटेस्ट अपडेट 👉 लाडकी बहीण योजना 3.0 लवकरच सुरू? पात्र महिलांना मिळणार 2100 रुपये दरमहा.
🔴 नोकरी 👉 परीक्षा नाही, थेट मुलाखतीद्वारे नोकरी, पगार ₹1.73 लाखांपर्यंत.