Ladki Bahin Yojana February Installment Update Ajit Pawar : महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावर मोठ स्पष्टीकरण दिल आहे. त्यांनी सांगितल की, या योजनेला कोणताही धोका नाही. यासोबतच, फेब्रुवारीचा हप्ता आठ दिवसांत खात्यात जमा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लाडकी बहीण योजना बंद होणार का?
अजित पवार यांनी माध्यमांवर संताप व्यक्त करत सांगितले की, “लाडकी बहीण योजना बंद करायची की नाही, हे राज्य सरकार ठरवेल. तुम्हाला कोणी अधिकार दिला?” त्यांनी जालन्यातील परतूर येथे झालेल्या सभेत हे वक्तव्य केले.
फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार?
- अजित पवार यांनी सांगितले की, ३५०० कोटी रुपयांच्या चेकवर सही करून आलो आहे.
- पुढील आठ दिवसांत लाभार्थींना फेब्रुवारीचा ₹१५०० चा हप्ता मिळेल.
योजनेचा लाभ अपात्र महिलांनी घेऊ नये – अजित पवार
- ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी आहे.
- “ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे, त्यांनी या योजनेचा लाभ घेणे योग्य नाही,” असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
- सरकार राज्याला आर्थिक शिस्त लावण्यासाठी कटिबद्ध आहे.
महिला लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती
✅ फेब्रुवारीचा हप्ता: ८ दिवसांत जमा होणार.
✅ योजना बंद नाही: अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
✅ अपात्र अर्ज बाद: आर्थिक सक्षम महिलांनी लाभ घेऊ नये.
लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, याची उपमुख्यमंत्र्यांनी हमी दिली आहे. लाभार्थींनी फेब्रुवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा करावी. सरकार नवीन आर्थिक वर्षात या योजनेच्या हफ्ता वाढीसंदर्भात घोषणा करू शकते.