Ladki Bahin Yojana February Payment Update: फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार? मोठी अपडेट समोर!

1 Min Read
Ladki Bahin Yojana February Payment Update

(Ladki Bahin Yojana February Payment Update) मुंबई, 16 फेब्रुवारी 2025 – महाराष्ट्रातील लाखो महिलांना आर्थिक लाभ देणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Majhi Ladki Bahin Yojana February Installment) फेब्रुवारी हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अनेक महिलांना फेब्रुवारी महिन्यात ₹1500 मिळणार नाहीत अशी शक्यता आहे. अर्जांची पडताळणी सुरू असून, हा हप्ता मार्च महिन्यात मिळण्याची शक्यता आहे.

फेब्रुवारीच्या हफ्त्यास उशीर का होणार?

माझी लाडकी बहीण योजनेसाठी (Mazi Ladki Bahin Yojana) अर्ज केलेल्या महिलांची पाच टप्प्यांमध्ये पडताळणी केली जात आहे. सध्या चारचाकी वाहन असलेल्या महिलांची तपासणी सुरू असून, याला आठ ते दहा दिवस लागतील. त्यानंतर हा अहवाल शासनाकडे पाठवला जाणार आहे. यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.

कोणत्या कारणांमुळे महिलांचे अर्ज बाद होत आहेत?

योजनेत आतापर्यंत साडेपाच लाख महिलांचे अर्ज बाद झाले आहेत. हे अर्ज पुढील कारणांमुळे बाद करण्यात आले आहेत –
✔️ महिलांकडे चारचाकी वाहन असल्यास
✔️ इतर सरकारी योजनांचा लाभ घेत असल्यास
✔️ वयोगट 21 ते 65 वर्षांच्या बाहेर असल्यास

फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार?

पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच ₹1500 जमा होतील. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता मार्चमध्ये मिळण्याची शक्यता आहे.

🔴 नोकरी 👉 भारतीय सैन्य भरती 2025: भारतीय सैन्यात पदवीधरांसाठी भरती.

Share This Article