Ladki Bahin Yojana Income Tax: लाखो लाडक्या बहिणी धोक्यात, राज्य सरकारकडून आयकर नोंदींची पडताळणी

2 Min Read
Ladki Bahin Yojana Income Tax Verification

Ladki Bahin Yojana Income Tax Verification : राज्य सरकार आता ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या’ (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) लाभार्थी महिलांचे इन्कम टॅक्स रेकॉर्ड तपासणार आहे. त्यामुळे आता लाखो महिलांना योजनेसाठी अपात्र ठरवले जाण्याची शक्यता आहे. (Maharashtra govt to verify income tax records of Ladki Bahin Yojana applicants. Strict eligibility checks may disqualify 10 lakh women. Find out if you qualify).

पडताळणीचा नवा टप्पा सुरू

निवडणुकीपूर्वी अर्ज केलेल्या सर्व महिलांना योजनेचा लाभ मिळाला होता. मात्र, निवडणूक संपल्यानंतर सरकारकडून कठोर पडताळणी सुरू झाली. याआधी चारचाकी वाहन असलेल्या महिलांची छाननी करण्याचे काम सुरु आहे. अशातच आता राज्य सरकारने प्राप्तिकर विभागाकडून महिलांची आयकर माहिती मागवली आहे.

🔴 हेही वाचा 👉 रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची सूचना!.

१० लाख महिला अपात्र ठरण्याची शक्यता

आतापर्यंत ५ लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. चारचाकी वाहन निकषानुसार दीड लाख महिलांनी स्वतःहून योजनेचा लाभ नाकारला आहे. सरकारच्या नव्या कारवाईनंतर पुढील काही आठवड्यात एकूण १० लाख महिलांना अपात्र ठरवले जाण्याची शक्यता आहे.

कोणत्या महिलांचे तपासले जाणार रेकॉर्ड?

  • सरकार लाभार्थ्यांची आयकर नोंदणी तपासणार आहे.
  • वार्षिक उत्पन्न सरकारी निकषांपेक्षा अधिक असल्यास अपात्र ठरवले जाणार.
  • मुंबई, कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मोठ्या संख्येने महिलांना अपात्र ठरवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महिला आणि बालविकास विभागाने योजनेतील निकषांची अंमलबजावणी सुरूच ठेवली आहे. निवडणुकीपूर्वी योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात दिला गेला होता. मात्र, आता फक्त पात्र महिलांनाच मदत मिळेल, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

योजनेसंदर्भात अधिक अपडेट्ससाठी फॉलो करा 👉 ‘मराठी सरकारी योजनाला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा.

🔴 हेही वाचा 👉 नागपूरच्या हजारो महिलांचे अर्ज बाद! आता मिळणार नाही लाभ.

Share This Article