Ladki Bahin Yojana Maharashtra Update : महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे. निवडणुकीपूर्वी मोठ्या गजावाजात सुरु केलेल्या या योजनेचा आता सरकारला आर्थिक फटका बसू लागला आहे. परिणामी, सरकारने लाभार्थ्यांसाठी नवे कठोर निकष लागू केले आहेत. यामुळे अनेक महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दरमहा १५०० रुपये थेट बँक खात्यात जमा केले जात होते. यामुळे जवळपास २.५ कोटी महिला लाभार्थी बनल्या. तसेच, सत्ता मिळाल्यास हा निधी २१०० रुपयांपर्यंत वाढवण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
सरकारसमोर आर्थिक संकट
माझी लाडकी बहीण योजनेसाठी (Mazi Ladki Bahin Yojana) सरकारला दरवर्षी सुमारे ४६,००० कोटी रुपये खर्च करावे लागत आहेत. भविष्यात हा खर्च ६३,००० कोटींवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारला आर्थिक तुटीचा सामना करावा लागत आहे. अलीकडेच शिक्षक व इतर सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार लांबणीवर पडले होते. तसेच विकासकामांनाही मोठा फटका बसत आहे.
आर्थिक भार लक्षात घेता, सरकारने आता योजनेचे निकष कठोर करण्यास सुरुवात केली आहे. एका महिन्यात ५ लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. सुरु असलेल्या तपासणीमुळे हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
🔴 हेही वाचा 👉 रुपयाची किंमत झाली कमी, सार्वकालिक नीचांकी पातळीवर भारतीय रुपया.
राजकीय वातावरण तापले
ही कारवाई होताच विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारने महिलांना आधी आश्वासने दिली आणि आता त्यांना योजनेतून वगळत आहे, असा आरोप केला जात आहे. CAG अहवालानुसार, राज्याची आर्थिक तूट २ लाख कोटींच्या पुढे गेली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना सरकारसाठी मोठे आव्हान ठरत आहे.
🔴 हेही वाचा 👉 सरकार बंद करणार 3 महत्त्वाच्या सरकारी योजना? मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा.
महिलांना पैसे परत करावे लागणार?
महिला लाभार्थींना मिळालेले पैसे परत मागितले जाणार नाहीत, असे सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र, भविष्यात लाभ घेण्यासाठी पात्रता निकषांचे पालन करावे लागणार आहे.
योजनेत आणखी बदल होणार?
निकष आणखी कठोर होण्याची शक्यता असून, लाभार्थींची संख्या लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते. महिलांसाठी या योजनेत पुढे काय होईल, यावर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
🔴 नोकरी 👉 १०वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी, अर्ज सुरू.