मुंबई | 5 फेब्रुवारी 2025: Ladki Bahin Yojana New Rule Car Owners Ineligible – महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) नवे नियम लागू केले आहेत. आता कुटुंबातील सदस्याच्या नावावर चारचाकी वाहन असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे अनेक महिलांना याचा फटका बसणार आहे.
नव्या नियमांमुळे महिलांचे अर्ज बाद
महाराष्ट्रातील महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेत मोठा बदल केला आहे. नव्या नियमानुसार, महिलेच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर चारचाकी वाहन असल्यास ती लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरेल.
काय आहेत पात्रतेचे निकष?
▪️ महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी.
▪️ वय 21 ते 65 वर्षांदरम्यान असावे.
▪️ वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे.
▪️ घरात कोणीही इनकम टॅक्स भरत असेल, तर लाभ मिळणार नाही.
▪️ कुटुंबातील सदस्याच्या नावावर चारचाकी वाहन असल्यास लाभ मिळणार नाही.
विरोधकांची प्रतिक्रिया
महिलांच्या कुटुंबातील चारचाकी वाहन असल्याने त्यांना योजनेंतर्गत अपात्र ठरवणे चुकीचे असल्याचे मत विरोधी पक्षांनी व्यक्त केले आहे. काही महिलांनी कोरोनापूर्वी गाडी घेतली असली तरी आता त्यांच्या आर्थिक परिस्थितीत मोठे बदल झाले आहेत. काही महिलांच्या घरात लाख दोन लाखांची जुनी खरेदी केलेली चारचाकी आहे. त्यामुळे अशा महिलांना वंचित ठेवणे योग्य नाही, असे काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
🔴 हेही वाचा 👉 चारचाकी असलेल्या लाडक्या बहिणी अपात्र, पण दुचाकी असणाऱ्यांच काय?.
महिलांमध्ये नाराजी
माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mazi Ladki Bahin Yojana) नव्या नियमामुळे अनेक महिलांचे नाव लाडकी बहिण योजनेतून वगळले जाणार आहे. अनेक कुटुंबांमध्ये महागड्या दुचाकी गाड्या असतात, पण त्यावर निर्बंध नाहीत. मात्र जुन्या चारचाकी वाहनामुळे लाभ बंद केला जाणार असल्याने ग्रामीण भागातील महिलांमध्ये मोठी नाराजी आहे.
🔴 हेही वाचा 👉 आता लगेच समजणार! लाडक्या बहिणीच्या कुटुंबात चारचाकी वाहन आहे का? हा मोठा निर्णय लवकरच….