Ladki Bahin Yojana Rejected Applications Reason: नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेचे तब्बल २२,२१९ अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत. उत्पन्नाची मर्यादा, आवश्यक कागदपत्रांची कमतरता आणि इतर योजनांचा लाभ घेतल्यामुळे अनेक हे अर्ज बाद झाले आहेत.
२२ हजारांहून अधिक अर्ज अपात्र का ठरले?
- रहिवासी पुराव्याचा अभाव – अर्जदारांकडे महाराष्ट्रातील कायमस्वरूपी रहिवासी असल्याचा पुरावा नसणे.
- उत्पन्न मर्यादा ओलांडली – शासनाने ठरवलेल्या उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असणाऱ्या महिलांचे अर्ज बाद झाले.
- आधार कार्ड त्रुटी – आधार कार्डशी संबंधित त्रुटीमुळे अर्ज नाकारण्यात आले.
- इतर सरकारी योजनांचा लाभ घेतला असणे – जसे की संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी निराधार योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, यामध्ये लाभार्थी असलेल्या महिलांना अपात्र ठरवण्यात आले.
- पडताळणीमध्ये त्रुटी – पंचायत समिती, विधानसभा स्तर आणि शासन स्तरावर झालेल्या चौकशीत काही अर्ज अवैध आढळले.
अनेक महिलांनी योजनेचा लाभ घेण्यास दिला नकार
विशेष म्हणजे, अनेक महिलांनी स्वेच्छेने या योजनेतून माघार घेतली. त्यामागची कारणे अशी आहेत:
- चारचाकी वाहन खरेदी केल्याने अपात्रता
- सरकारी नोकरी मिळाल्याने योजनेसाठी अपात्र
- आधीच इतर सरकारी योजनांचा लाभ घेत असल्याने
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) अधिक पारदर्शक करण्यासाठी आणि अपात्र अर्जदारांना योजनेतून वगळण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडून नव्या सुधारणा करण्यात येत आहेत. लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थी महिलांनी योजनेचे सर्व पात्रता निकष पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेच्या अर्जदारांची कडक छाननी, फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई.