Ladki Bahin Yojana 2100 Rs: महिलांना दिलासा! मिळणार ₹2100? एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

2 Min Read
Ladki Bahin Yojana Update 2100 Rs Payment

Ladki Bahin Yojana Update 2100 Rs Payment : महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) सुरू होऊन आठ महिने पूर्ण झाले आहेत. या योजनेअंतर्गत सध्या पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळत आहे. फेब्रुवारी महिन्यात लाडकी बहीण योजनेच आठवा हफ्ता मिळणार आहे. मात्र, सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेल्या 2100 रुपयांच्या आश्वासनाच काय झाल? यावर संपूर्ण महाराष्ट्राच लक्ष लागल आहे.

2100 रुपये कधी मिळणार?

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीदरम्यान लाडकी बहीण योजनेच्या हफ्त्याची रक्कम वाढवण्याचे आश्वासन दिले होते. सरकार स्थापन होऊन दोन महिने झाले तरी अद्याप त्यावर कोणतीही घोषणा झालेली नाही. मात्र, मार्च महिन्यात राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2025) सादर केले जाणार आहे. त्यानंतर लाभार्थी महिलांना दरमहा 2100 रुपये दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

योजना बंद होणार? विरोधकांचे दावे आणि सरकारच उत्तर

विरोधकांच्या मते, जर राज्यातील 2.41 कोटी लाभार्थींना दरमहा 2100 रुपये देण्यात आले, तर याचा लवकरच राज्याच्या अर्थव्यवस्थेवर मोठा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सरकारकडून काही कारण दाखवून योजना बंद केली जाऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

🔴 हेही वाचा 👉 घरात चारचाकी वाहन असलेल्या महिलांचे लाभ रद्द होणार? सरकारचे स्पष्टीकरण.

ठाणे येथे महिला मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केल:

एकनाथ शिंदे म्हणाले – “लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आम्ही जे वचन दिले, ते पाळू. महायुती सरकार महिलांच्या सशक्तीकरणासाठी वचनबद्ध आहे.”

महिलांना दिलासा! सरकार लवकरच घेणार निर्णय

महिला मतदारांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा पाठिंबा दिला होता. शिंदे म्हणाले, “महिलांच्या पाठिंब्यामुळेच आम्हाला इतके मोठे यश मिळाले. त्यामुळे लाडकी बहीण योजना आम्ही आणखी मजबूत करू.”

मार्च महिन्यातील बजेटनंतर सरकारकडून मोठी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. महिलांना 2100 रुपये कधीपासून मिळणार हे लवकरच स्पष्ट होईल.

🔴 हेही वाचा 👉 फेब्रुवारी अखेरीस पूर्ण होणार चौकशी, ‘अशी’ आहे पडताळणी प्रक्रिया.

Share This Article