अपात्र महिलांकडून सरकार वसूल करणार ९,००० रुपये? वसुलीची यादी तयार, लाखो महिलांचा समावेश Ladki Bahin Yojna Ineligible Beneficiaries Refund

2 Min Read
Ladki Bahin Yojna Ineligible Beneficiaries Refund Fact Check

Ladki Bahin Yojna Ineligible Beneficiaries Refund Fact Check – लाडकी बहिण योजनेबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. काही अपात्र महिलांना आतापर्यंत दिलेले ९,००० रुपये सरकार परत घेणार असल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या यादीत तब्बल ५ लाख महिलांचा समावेश असल्याचा उल्लेख आहे. मात्र, हा दावा कितपत खरा आहे? चला, त्यामागच सत्य जाणून घेऊयात…

व्हायरल मेसेजमध्ये काय दावा करण्यात आला आहे?

सोशल मीडियावर फिरत असलेल्या मेसेजमध्ये सांगण्यात येत आहे की, महाराष्ट्र सरकारने लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी सुरू केली आहे. या तपासणीत ५ लाख महिलांना अपात्र ठरवले असून, त्यांनी मिळालेले पैसे सरकार वसूल करणार आहे आणि त्यासाठी पैसे वसुल करणाऱ्या महिलांच्या नावाची यादी बनवण्यात आली आहे. त्यामुळे अनेक लाभार्थी घाबरले आहेत.

कोणत्या महिलांना अपात्र ठरवण्यात आले?

राज्य सरकारने काही निकष निश्चित केले आहेत. त्यानुसार, संजय गांधी निराधार योजना लाभार्थी, ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला, इतर योजनेच्या लाभार्थी, आणि कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहन असलेल्या महिला यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. काहींनी आपले अर्ज स्वेच्छेने मागे घेतले, तर काहींना लाभ मिळण बंद झाल आहे.

मंत्री अदिती तटकरेंच स्पष्टीकरण?

लाडकी बहिण योजनेतील अपात्र लाभार्थींना मिळालेले ९,००० रुपये सरकार परत घेणार नाही. यामुळे राज्याच ४५० कोटी रुपयांच नुकसान झाल असल, तरीही सरकार हे पैसे वसूल करणार नसल्याच मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी स्पष्ट केल आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील मेसेज अफवा असल्याच निष्पन्न झाल आहे.

🔴 लेटेस्ट अपडेट 👉 सोन्याचा आजचा भाव (९ फेब्रुवारी २०२५).

काय आहे सत्य?

✔ ५ लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आल आहे.
✔ नियमबाह्य अर्ज भरलेल्या लाभार्थ्यांचे अर्ज बाद करण्यात येणार आहेत.
✔ अपात्र महिलांना योजनेचा लाभ मिळण बंद होईल, मात्र आधी दिलेले पैसे परत मागितले जाणार नाहीत.
✔ पैसे परत घेण्याचा दावा हा फेक असून, यावर विश्वास ठेवू नका.

व्हायरल मेसेजमध्ये सांगितल्याप्रमाणे सरकार अपात्र लाडक्या बहिणींना दिलेले पैसे परत घेणार नाही. मात्र, चुकीची माहिती पसरवणाऱ्यांपासून सावध राहा आणि अधिकृत स्त्रोतांकडूनच माहिती मिळवा.

🔴 हेही वाचा 👉 महाराष्ट्र बोर्ड परीक्षा 2025: दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी शिक्षण मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय.

Share This Article