Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे सर्वेक्षण बंद! अंगणवाडी सेविकांचा सरकारला इशारा, मागण्या पूर्ण न झाल्यास…

2 Min Read
Maharashtra Anganwadi Sevika Protest Ladki Bahin Yojana Survey Halted

Maharashtra Anganwadi Sevika Protest Ladki Bahin Yojana Survey Halted : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्वेक्षणावरून अमरावतीतील अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या आहेत. आमच्या विविध मागण्यांकडे सरकारने लक्ष दिले नाही, तर योजनेचे सर्वेक्षण करणार नाही, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.

अंगणवाडी सेविकांचा सरकारला इशारा

Maharashtra News: अमरावती जिल्ह्यातील हजारो अंगणवाडी सेविकांनी महिला व बालविकास विभागाच्या मुख्य कार्यालयावर मोर्चा काढला. रस्त्यावर उतरून त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर लाडकी बहीण योजनेचे सर्वेक्षण करणार नाही!” असा इशारा त्यांनी दिला आहे.

अंगणवाडी सेविकांच्या प्रमुख मागण्या

  1. प्रति फॉर्म ५० रुपये मानधन – लाडकी बहीण योजनेचे रखडलेले मानधन मिळावे.
  2. राज्य सरकारी कर्मचारी दर्जा – अंगणवाडी सेविकांना सरकारी कर्मचारी म्हणून मान्यता द्यावी.
  3. ग्रॅच्युटी व इतर भत्ते – सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार ग्रॅच्युटी आणि इतर लाभ द्यावेत.
  4. योग्य मोबदला व नियमित भत्ते – वेतन आणि भत्ते वेळेवर द्यावेत.

🔴 हेही वाचा 👉 2025 मध्ये सोन्याची किंमत वाढेल की कमी होईल? WGC चा अचूक अंदाज.

मोर्चानंतर सरकारवर दबाव वाढणार?

संघटनेच्या नेत्यांनी सांगितले की, मागील संपावेळी सरकारने पेन्शन आणि इतर मागण्यांचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे ३ मार्च रोजी मुंबईतील विधानभवनावर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

लाडकी बहीण योजनेवर परिणाम होणार का?

अंगणवाडी सेविकांच्या या आंदोलनामुळे लाडकी बहीण योजनेच्या सर्वेक्षण प्रक्रियेला फटका बसू शकतो. जर सरकारने लवकर निर्णय घेतला नाही, तर माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mazi Ladki Bahin Yojana) अंमलबजावणीत अडथळे निर्माण होऊ शकतात. आता सरकार यावर काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

🔴 हेही वाचा 👉 चारचाकी आहे, तर नाही मिळणार लाडकी बहीण योजनेचा हफ्ता, जाणून घ्या नवीन पात्रता निकष.

Share This Article