Majhi Ladki Bahin Yojana 2100 Rupees Update 11 February 2025 : १ मार्च २०२५ रोजी राज्य सरकारकडून मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सरकारच्या माझी लाडकी बहिण योजनेतुन (Mazi Ladki Bahin Yojana) महिलांना दरमहा मिळणारी रक्कम १५०० रुपयांवरून २१०० रुपये केली जाण्याची शक्यता आहे. महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना दर महिन्याला २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पात (Maharashtra Budget 2025) यासंदर्भात मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लाडकी बहीण योजनेचे २१०० रुपये कधी मिळणार?
राज्य सरकारने अद्याप यासंदर्भात अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, १ मार्च २०२५ रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात हा निर्णय होण्याची शक्यता आहे. काही नेत्यांनी अर्थसंकल्पानंतर महिलांना वाढीव रक्कम मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. महिला व बालविकास विभागाने अद्याप यासंदर्भात कोणताही प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठवलेला नाही. त्यामुळे योजनेत सुधारणा करण्यासाठी किमान ३-४ महिने लागू शकतात.
🔥 हेही वाचा 👉 लाडकी बहिण योजनेच्या 8व्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट.
राज्य सरकारने पात्र महिलांची नवीन यादी जाहीर केली आहे. पडताळणीत लाखो महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत.
✖ ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिलांचे अर्ज रद्द
✖ इतर सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना अपात्र ठरवले
✖ योग्य माहिती न दिलेल्या अर्जदारांना वगळण्यात आले
महिलांनी आता काय करावे?
✔ १ मार्च २०२५ रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पावर लक्ष ठेवा.
✔ सरकारी अधिकृत संकेतस्थळावरुन अपडेट मिळवत राहा.
✔ बँक खाते DBT साठी सक्षम आहे का, हे तपासा.
✔ योजनेशी संबंधित कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.
🔴 हेही वाचा 👉 महिलांसाठी उत्कृष्ट संधी, ही योजना बनवेल फक्त 2 वर्षांत महिलांना लखपती.
महिला लाभार्थींना दिलासा मिळणार का?
लाडकी बहीण योजनेचा हफ्ता २१०० रुपये करण्याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. पण लाडक्या बहिणींना मार्चपासून २१०० रुपये मिळणार की नाही हे अर्थसंकल्पानंतर (Budget 2025 Maharashtra) स्पष्ट होईल, त्यामुळे महिलांना २१०० रुपयांसाठी अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे.
🔴 सोन्याचा दर 👉 सोन्याचा आजचा भाव 11 फेब्रुवारी 2025.