Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Eligibility Verification 2025: महिला व बालविकास विभागाकडून घरात चारचाकी वाहन असूनही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (Mazi Ladki Bahin Yojana) लाभ घेत असलेल्या महिलांना योजनेतून वगळण्यासाठी आता मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
परिवहन विभाग करणार पडताळणी
राज्य परिवहन विभागाकडे राज्यातील सर्व वाहनांची ऑनलाइन नोंद आहे. त्यामुळे कोणत्या महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन आहे, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. याआधीही सरकारने चारचाकी वाहन असलेल्या कुटुंबातील महिलांना अपात्र ठरवले जाईल असे स्पष्ट केले होते. मात्र अधिकृत निर्णयानंतर आता या नियमाची अंमलबजावणी वेगाने होणार आहे.
महिलांकडून वसुली होणार का?
महिला व बालविकास विभागाने अद्याप हे स्पष्ट केलेले नाही की, अपात्र ठरलेल्या महिलांकडून आतापर्यंत जमा झालेले पैसे परत घेतले जातील का. तसेच, योजनेचे निकष उल्लंघन केल्याबद्दल दंड आकारला जाईल का, याचीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
राज्यातील अनेक महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत. सरकारकडून लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांनी नवीन अपडेट्सवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
🔴 हेही वाचा 👉 फेब्रुवारी अखेरीस पूर्ण होणार चौकशी, ‘अशी’ आहे पडताळणी प्रक्रिया.