PM Kisan Yojana 19th Installment Status Check: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या योजनांपैकी एक असून, शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6,000 ची मदत दिली जाते, जी दर चार महिन्यांनी ₹2,000 हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा केली जाते.
आतापर्यंत पिएम किसान योजनेचे 18 हप्ते जारी झाले असून, आता शेतकरी 19व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. सरकारने 24 फेब्रुवारी 2025 रोजी हा हप्ता जारी करण्याची तारीख निश्चित केली आहे. मात्र, काही कारणांमुळे सर्व शेतकऱ्यांना या हफ्त्याचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे तुमचे नाव यामध्ये आहे का, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
PM Kisan Yojana 19वा हप्ता: तुम्हाला मिळणार की नाही कस तपासाल?
जर तुम्हाला जाणून घ्यायच असेल की, तुम्हाला PM किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याचा लाभ मिळेल की नाही, तर तुम्ही PM Kisan Yojana अधिकृत वेबसाइटवर जाऊन स्टेटस तपासू शकता.
पिएम किसान योजना स्टेटस कसे तपासावे?
1️⃣ स्टेप 1:
- सर्वप्रथम pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2️⃣ स्टेप 2:
- होमपेजवर ‘Know Your Status’ किंवा ‘आपले स्टेटस जाणून घ्या’ या पर्यायावर क्लिक करा.
- येथे नोंदणी क्रमांक टाका.
- नोंदणी क्रमांक माहिती नसल्यास ‘Know your registration no.’ वर क्लिक करून मिळवा.
3️⃣ स्टेप 3:
- दिलेल्या बॉक्समध्ये कॅप्चा कोड भरा आणि ‘Get Details’ वर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्याची संपूर्ण माहिती दिसेल आणि तुम्हाला 19वा हप्ता मिळणार का नाही, हे समजेल.
या शेतकऱ्यांना 19वा हप्ता मिळणार नाही?
- जर आधार कार्ड आणि बँक खात्यातील नावामध्ये विसंगती असेल, तर हप्ता रोखला जाऊ शकतो.
- जर KYC अपडेट नसेल किंवा बँक खाते NPCI शी लिंक नसेल, तर पेमेंट अडकू शकते.
- लाभार्थ्यांची वार्षिक उत्पन्न मर्यादा किंवा जमीन धारणा नियम पूर्ण होत नसल्यास, हप्ता मिळणार नाही.
तुम्ही जर अद्याप e-KYC अपडेट केले नसेल, तर लवकरात लवकर CSC केंद्र किंवा ऑनलाइन पोर्टल वर जाऊन प्रक्रिया पूर्ण करा. तसेच, आधार आणि बँक खाते लिंक करा.
🔴 हेही वाचा 👉 शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! आता Farmer ID असल्याशिवाय मिळणार नाही PM किसान योजनेचा लाभ.
शेवटची संधी – त्वरित स्टेटस तपासा!
PM Kisan 19th Installment: 24 फेब्रुवारी 2025 रोजी 19वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर स्टेटस तपासा आणि गरज असल्यास त्वरित अपडेट करा!
🔴 हेही वाचा 👉 धुणीभांडी, घरकाम करणाऱ्यांसाठी आहे ही सरकारी योजना; मिळतो आर्थिक लाभ, जाणून घ्या संपूर्ण माहिती.