PM Mudra Yojana Apply: नवीन व्यवसाय सुरू करणे हे मोठे आव्हान असते. अनेक जण उत्तम व्यवसाय कल्पना असूनही भांडवलाच्या अभावामुळे व्यवसाय सुरु करू शकत नाहीत. या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी भारत सरकारने प्रधानमंत्री मुद्रा योजना (PM Mudra Yojana) सुरू केली आहे. या योजनेंतर्गत कोणत्याही तारणाशिवाय २० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेची वैशिष्ट्ये
- शिशु कर्ज: ₹५०,००० पर्यंत
- किशोर कर्ज: ₹१० लाख पर्यंत
- तरुण कर्ज: ₹२० लाख पर्यंत
- तारण (Guarantee) आवश्यकता नाही
- सवलतीच्या व्याजदरावर कर्ज उपलब्ध
कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
- व्यवसाय योजना (Business Plan)
- प्रकल्प अहवाल (Project Report)
- आधार कार्ड व ओळखपत्र
- पॅन कार्ड
- व्यवसाय आणि राहत्या ठिकाणाचा पुरावा
- ITR आणि सेल्फ-टॅक्स रिटर्नची प्रत
कर्ज कसे मिळवायचे?
प्रधानमंत्री मुद्रा योजनेतुन कर्ज घेण्यासाठी बँकेत अर्ज करू शकता किंवा अधिकृत वेबसाइट https://www.mudra.org.in यावर जाऊन अर्ज करावा.
ही योजना नवीन व्यावसायिकांसाठी सुवर्णसंधी असून, कमी भांडवलात मोठ्या व्यवसायाची सुरुवात करण्याची संधी प्रदान करते.
🔴 हेही वाचा 👉 Ladki Bahin Yojana February Payment Update: 16 लाख महिलांना बसला फटका, मिळणार नाही फेब्रुवारीचा हफ्ता.