PM Surya Ghar Yojana 2025: 8.40 लाख कुटुंबांचे वीज बिल झाले शून्य, तुम्हीही अशा प्रकारे मिळवू शकता लाभ!

2 Min Read
PM Surya Ghar Yojana Electricity Bill Zero Benefits Apply

PM Surya Ghar Yojana Electricity Bill Zero Benefits Apply : पिएम सूर्य घर योजना (PM Surya Ghar Yojana) ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांच्या घरांवर सोलर पॅनेल (Solar Panel) बसवले जातात, ज्यामुळे त्यांचे वीज बिल शून्यावर आले आहे. सरकारने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, 8.40 लाख कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.

सूर्य घर योजनेतून किती लोकांना लाभ मिळाला?

  • 27 जानेवारी 2025 पर्यंत 8.40 लाख कुटुंबांचे वीज बिल शून्य झाले आहे.
  • सरकारने आतापर्यंत ₹4308.66 कोटींची सबसिडी दिली आहे.
  • 2027 पर्यंत 1 कोटी कुटुंबांना या योजनेत समाविष्ट करण्याच सरकारच लक्ष्य आहे.

योजनेचा लाभ कसा घ्यायचा?

स्टेप 1: ऑनलाइन नोंदणी करा

  • अधिकृत वेबसाइट pmsuryaghar.gov.in वर जा.
  • रजिस्ट्रेशन करा आणि आवश्यक माहिती भरा.

स्टेप 2: अर्ज प्रक्रिया आणि सोलर पॅनेल बसवणे

  • अर्ज सबमिट केल्यानंतर डिस्कॉम कंपनीकडून मंजुरी मिळेल.
  • मंजुरी मिळाल्यानंतर घरावर सोलर पॅनेल बसवले जाईल.
  • पॅनेल बसल्यानंतर नेट मीटरसाठी अर्ज करावा लागेल.

स्टेप 3: सबसिडी कशी मिळेल?

  • नेट मीटर बसल्यानंतर डिस्कॉम कंपनी तपासणी करेल.
  • तपासणीनंतर प्रमाणपत्र दिले जाईल.
  • यानंतर बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड सबमिट करावा लागेल.
  • बँक डिटेल्स दिल्यानंतर 30 दिवसांत सबसिडी थेट खात्यात जमा केली जाईल.

पीएम सूर्य घर योजना (PM Surya Ghar Yojana 2025) वीज बचतीसाठी खुप फायदेशीर आहे. 8.40 लाख कुटुंबांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. तुम्हीही आपल्या वीज बिलात मोठी बचत करू शकता. इच्छुक नागरिकांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

🔴 हेही वाचा 👉 Free Cycle Scheme Maharashtra: या योजनेतून शालेय विद्यार्थ्यांना मिळणार मोफत सायकल.

Share This Article