2025 मध्ये मोफत गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया PM Ujjwala Yojana 2025 Online Apply

2 Min Read
PM Ujjwala Yojana Free Gas Cylinder Apply Online

PM Ujjwala Yojana 2025 Online Apply : अजूनही अनेक घरांमध्ये स्वयंपाकासाठी लाकूड, शेणाच्या गोवऱ्या आणि इतर पारंपरिक इंधनांचा वापर केला जातो, ज्यामुळे महिलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. महिलांना धुरापासून मुक्त करण्यासाठी आणि त्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान उज्ज्वला योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील महिलांना मोफत गॅस कनेक्शन (Free Gas Cylinder 2025) देण्यात येते.

जर तुम्हीही या योजनेचा लाभ घ्यायचा विचार करत असाल, तर अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया समजून घ्या.

उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत गॅस सिलेंडर कसा मिळवायचा?

पिएम उज्ज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे बीपीएल (गरीबी रेषेखालील) किंवा अंत्योदय अन्न योजना (AAY) योजनेत नाव असणे आवश्यक आहे. अर्जदाराच्या नावावर बँक खाते आणि आधार कार्ड असणे बंधनकारक आहे.

पिएम उज्ज्वला योजना अर्ज करण्याची प्रक्रिया

  1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या:
    https://pmuy.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. अर्जाचा फॉर्म भरा:
  • Apply for New Ujjwala 2.0 Connection या पर्यायावर क्लिक करा.
  • उपलब्ध गॅस वितरकांच्या यादीतून तुमच्या सोयीचा गॅस पुरवठादार निवडा.
  1. आवश्यक माहिती भरा:
  • अर्जदाराचे नाव
  • गॅस वितरकाचे नाव
  • मोबाईल नंबर
  • संपूर्ण पत्ता आणि पिन कोड
  1. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा:
  • आधार कार्ड
  • बीपीएल प्रमाणपत्र किंवा अंत्योदय कार्ड
  • बँक खाते तपशील
  1. अर्ज सबमिट करा:
    सर्व माहिती भरल्यानंतर Submit बटणावर क्लिक करा.

मोफत गॅस कनेक्शनसाठी पात्रता?

  • अर्जदार महिलेचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे.
  • अर्जदाराचे नाव SECC-2011 डेटामध्ये असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराच्या कुटुंबात गॅस कनेक्शन नसावे.
  • लाभार्थीचे बँक खाते DBT (Direct Benefit Transfer) साठी सक्षम असावे.

🔴 हेही वाचा 👉 धुणीभांडी, घरकाम करणाऱ्यांसाठी आहे ही सरकारी योजना; मिळतो आर्थिक लाभ, जाणून घ्या संपूर्ण माहिती.

गॅस सिलेंडर कधी मिळेल?

योजनेचा अर्ज मंजूर झाल्यानंतर काही दिवसांत लाभार्थीच्या नावावर मोफत गॅस कनेक्शन दिले जाते. यासाठी स्थानिक गॅस वितरकाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

पंतप्रधान उज्ज्वला योजना (PM Ujjwala Yojana 2025) महिलांसाठी अत्यंत उपयुक्त योजना आहे. जर तुम्ही पात्र असाल आणि अद्याप या योजनेचा लाभ घेतला नसेल, तर वरील प्रक्रियेनुसार त्वरित अर्ज करा आणि मोफत गॅस सिलेंडरचा (Free Gas Yojana Maharashtra) लाभ घ्या!

🔴 हेही वाचा 👉 40 ते 65 वयोगटातील विधवा महिलांना आधार देणारी योजना, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या.

Share This Article