PMVY 2025: शहरात राहणाऱ्या लोकांना मिळतो का लाभ? जाणून घ्या पात्रता आणि फायदे

2 Min Read
PM Vishwakarma Yojana Urban Beneficiaries Eligibility Benefits

PM Vishwakarma Yojana 2025: प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना (PMVY) अंतर्गत पारंपरिक कौशल्य असलेल्या लोकांना आर्थिक मदत दिली जाते. सरकारने ही योजना कामगारांना आर्थिक मदत आणि प्रशिक्षण देण्यासाठी सुरू केली आहे. पण, अनेकांच्या मनात प्रश्न आहे की, या योजनेचा लाभ फक्त ग्रामीण भागातील लोकांनाच मिळतो का? की शहरी भागातील लोकही या योजनेचा लाभ घेऊ शकतात? जाणून घ्या संपूर्ण माहिती.

🔴 हेही वाचा 👉 Rajmata Jijau Free Cycle Scheme Maharashtra: या योजनेतून शालेय विद्यार्थ्यांना मिळणार मोफत सायकल.

PM Vishwakarma Yojana काय आहे?

पिएम विश्वकर्मा योजना ही योजना केंद्र सरकारने पारंपरिक कारागिरांना सक्षम करण्यासाठी सुरु केली आहे. याअंतर्गत पात्र लाभार्थींना कौशल्य प्रशिक्षण, आर्थिक मदत, टूलकिट आणि कमी व्याजदरावर कर्ज दिले जाते.

शहरी भागातील लोकही घेऊ शकतात लाभ?

होय, शहरी भागातील लोकही PM Vishwakarma Yojana या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात. मात्र, ते विशिष्ट पारंपरिक व्यवसायाशी संबंधित असणे आवश्यक आहे.

योजनेचे प्रमुख लाभ

  • प्रशिक्षण आणि आर्थिक मदत: लाभार्थींना प्रशिक्षणादरम्यान दररोज ₹500 मानधन दिले जाते.
  • टूलकिट सहाय्य: ₹15,000 पर्यंतच्या टूलकिटसाठी निधी दिला जातो.
  • कर्ज सुविधा:
  • पहिल्या टप्प्यात ₹1 लाख कर्ज दिले जाते.
  • हे कर्ज फेडल्यानंतर, अतिरिक्त ₹2 लाख कर्ज मिळू शकते.
  • कर्जावर अत्यल्प व्याजदर आणि कोणतीही हमी लागत नाही.

ही कामे करणारे लोक अर्ज करू शकतात

पारंपरिक कौशल्य असलेल्या खालील व्यवसायिकांना अर्ज करता येईल –

✔️ नाव बांधणी करणारे
✔️ सोनार
✔️ लोहार
✔️ चांबार
✔️ गवंडी
✔️ मूर्तिकार
✔️ कुलूप बनवणारे
✔️ दगड कोरणारे
✔️ बाहुल्या आणि खेळणी बनवणारे
✔️ माळी
✔️ धोबी
✔️ शिंपी
✔️ टोपल्या, चटया आणि झाडू बनवणारे
✔️ न्हावी
✔️ हत्यार आणि टूलकिट बनवणारे
✔️ मासेमारीचे जाळे बनवणारे

अर्ज कसा करावा?

  • अर्जदार www.pmvishwakarma.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात.
  • स्थानिक कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) वर जाऊनही नोंदणी करता येते.
  • अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, व्यवसाय प्रमाणपत्र, बँक खाते आणि इतर आवश्यक कागदपत्रे लागतात

🔴 हेही वाचा 👉 WhatsApp यूजर्ससाठी मोठा धोका! RBI ची महत्त्वाची चेतावणी, त्वरित खबरदारी घ्या.

शहरी भागातील कारागिरांनाही प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा (PM Vishwakarma Yojana 2025) लाभ मिळू शकतो. जर तुम्ही वरील व्यवसायांपैकी कुठल्याही कामात प्रवीण असाल, तर त्वरित अर्ज करा आणि या योजनेचा फायदा घ्या.

Share This Article