Ladki Bahin Yojana Latest Update Maharashtra : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) लाभार्थींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठा दिलासा दिला आहे. लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील भांडी घासणाऱ्या २० महिलांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. या महिलांना रसिकाश्रय (Rasikashraya) संस्थेने “जीवाची मुंबई, श्रमाची आनंदवारी” या उपक्रमांतर्गत मुंबईत आणले होते.
महिलांच्या भावना अन् मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
या भेटीदरम्यान अनेक महिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले. “भांडी घासून मिळणाऱ्या ५०० रुपयांत घर कस चालवायच?” असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. मात्र, लाडकी बहीण योजनेमुळे त्यांना मोठा आधार मिळाला आहे. “ही योजना केवळ आर्थिक मदत नाही, तर आमच्या जगण्याचा आधार आहे,” असे महिलांनी सांगितले.
यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही! उलट, अधिक मदत कशी देता येईल, याचाही विचार सुरू आहे.” त्यांच्या या आश्वासनाने महिलांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले.
महिलांची नवीन मागणी – दरवर्षी अतिरिक्त १०,००० रुपये मिळावेत
महिलांनी यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे एक विनंती केली. “सन्माननिधी म्हणून १०,००० रुपये दरवर्षी मिळावेत,” अशी त्यांची मागणी होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिला. “शासन पातळीवर या मागणीचा विचार करू,” असे त्यांनी सांगितले.
🔴 हेही वाचा 👉 सोने खरेदी करताना या 5 गोष्टींची घ्या काळजी, अन्यथा होऊ शकते तुमची फसवणुक.
‘निराधार योजना’ अंतर्गतही मदतीचे आश्वासन
काही वृद्ध महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नसल्याची माहिती समोर आली. त्यांना ‘निराधार योजना’ (Niradhar Yojana) या योजनेअंतर्गत मदत देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्र्यांसोबत महिलांचा अविस्मरणीय अनुभव
या भेटीदरम्यान महिलांना एक अनोखा अनुभव मिळाला. “आम्ही कधी विमान पाहिल नव्हत, पण आता त्यातून प्रवास केला. गेल्या दोन दिवसांत स्वर्गासारखी अनुभूती मिळाली,” अस एका महिलेने सांगितल.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी “रसिकाश्रय” संस्थेचे अभिनंदन केले. “या महिलांच्या संघर्षाची जाणीव करून दिल्याबद्दल तुमचे कौतुक आहे,” असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच, “राज्यातील गरीब जनतेचे जीवन सुसह्य करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे,” असेही ते म्हणाले.
🔴 हेही वाचा 👉 लाभार्थ्यांना दररोज ५०० रुपये देणारी सरकारी योजना, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या.
लाडकी बहीण योजनेबद्दल महिलांचा वाढता विश्वास
मुख्यमंत्र्यांच्या या भेटीनंतर महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. “माझी लाडकी बहीण योजना (Mazi Ladki Bahin Yojana) कायम सुरु राहील, हे ऐकून मन हलक झाल,” अस एक महिला म्हणाली.
राज्य सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना आणली आहे. भविष्यात योजनेत आणखी सुधारणा करण्याचा विचार सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
🔴 हेही वाचा 👉 असा करा मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी अर्ज.