Ladki Bahin Yojana February Installment: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! येत्या 48 तासात जमा होणार फेब्रुवारी महिन्याचा हप्ता?

3 Min Read
Ladki Bahin Yojana February 2025 Installment In 48 Hours

मुंबई, 13 फेब्रुवारी 2025: Ladki Bahin Yojana February 2025 Installment In 48 Hours – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लवकरच जमा होणार आहे. राज्य सरकार राज्यातील लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत देत आहे. आतापर्यंत सात हप्ते मिळाले असून, आता आठव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. सूत्रांनुसार, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 15 फेब्रुवारीनंतर लाभार्थी बहिणींच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार?

लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै 2024 पासून दरमहा 1500 रुपये मिळत आहेत. आतापर्यंत सात हप्त्यांमध्ये एकूण 10,500 रुपये जमा झाले आहेत. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 15 फेब्रुवारीनंतर जमा होऊ शकतो. जानेवारी महिन्याचा हप्ता वेळेवर मिळाल्यामुळे फेब्रुवारीच्या हप्त्यासाठीही लाडक्या बहिणींच्या मोठ्या अपेक्षा आहेत.

🔴 हेही वाचा 👉 आधार कार्डवर कर्ज! सरकारची नवीन योजना, कोणत्याही गॅरंटीविना, आता छोटे व्यावसायिक होणार आत्मनिर्भर.

लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये कधीपासून मिळणार?

निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. आता राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर हा निर्णय लागू केला जाऊ शकतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही घोषणा होईल, असे संकेत दिले आहेत.

🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट; हे ऐकून मन हलक झाल….

अपात्र महिलांकडून लाडकी बहीण योजनेचा लाभ परत घेणार? सरकारचे स्पष्टीकरण

निवडणुकीनंतर काही माध्यमांमध्ये असे वृत्त आले की, सरकार अपात्र लाभार्थींना मिळालेली रक्कम परत घेण्याचा विचार करत आहे. मात्र, महिला व बालविकास विभागाने हे वृत्त फेटाळले आहे. विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांनी स्पष्ट केले की, सरकार कोणत्याही लाभार्थी महिलेकडून रक्कम परत घेणार नाही.

लाडक्या बहिणींनी बँक खाते अपडेट ठेवावे

लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थी महिलांनी त्यांचे बँक खाते आणि आधार नंबर अपडेट ठेवावा. खाते बंद असेल किंवा आधार लिंक नसेल तर हप्ता अडकू शकतो.

लाडक्या बहिणींना सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. (Ladki Bahin Yojana 8th Installment) फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लवकरच मिळेल आणि मार्च 2025 पासून 2100 रुपये मिळण्याचीही शक्यता आहे.

🔴 हेही वाचा 👉 मोठ्या ब्रँड्सकडून सोन्याच्या दागिन्यांवर 50% पर्यंत सूट, कमी किमतीत दागिने खरेदी करण्याची संधी.

Share This Article