Ladki Bahin Yojana : चुकीची माहिती देणाऱ्या महिलांवर होणार कारवाई? अदिती तटकरे यांच मोठ विधान

2 Min Read
Ladki Bahin Yojana Action Against False Information Aditi Tatkare Statement

Ladki Bahin Yojana Action Against False Information Aditi Tatkare Statement: राज्यातील महिलांसाठी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ (Ladki Bahin Yojana) ही एक महत्त्वाची योजना आहे, ज्याअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. पण, आता या योजनेबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे. राज्यातील अनेक महिलांनी चुकीची माहिती देऊन लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणावर महिला आणि बालकल्याण मंत्री, अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी मोठ वक्तव्य केल आहे.

अदिती तटकरे यांनी स्पष्ट केल की, या योजनेतून लाभ घेत असलेल्या महिलांची चौकशी केली जाईल. जर कोणत्याही महिलांनी चुकीच्या माहितीवर आधारित अर्ज केले असतील, तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. त्यामुळे, या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने या प्रकरणावर कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

यावर अदिती तटकरे यांनी सांगितलं की, बनावट अर्जदारांना ‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत एकदाही सन्मान निधी वितरित करण्यात आलेला नाही. अशा महिलांची सखोल चौकशी केली जाणार आहे. यासोबतच त्यांच्यावर कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी घोषणा केली होती की, आगामी काळात ‘लाडकी बहीण योजने’साठी पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला 2100 रुपये जमा केले जातील. मात्र आता या योजनेत घडलेल्या गैरप्रकारमुळे महिलांचे अर्ज पडताळणी करण्यातच वेळ जात आहे.

राज्यातील महिलांसाठी ही योजना एक महत्त्वपूर्ण वित्तीय मदत ठरली आहे, फक्त योग्य लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रशासन कठोर पाऊले उचलत आहे.

🔴 हेही वाचा 👉 महिलांसाठी नवीन योजना, पाच लाख महिलांना होणार फायदा.

Share This Article