Ladki Bahin Yojana Car Owners Eligibility 2025 : महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांची तपासणी सुरू केली आहे. यामध्ये अशा महिलांची ओळख पटवली जात आहे, ज्यांच्याकडे चारचाकी वाहन असूनही त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. शासनाच्या निकषांनुसार, ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्याकडे चारचाकी वाहन असेल, त्या या योजनेसाठी पात्र ठरत नाहीत.
कार असलेल्या महिलांना लाभ नाकारला जाणार?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) या योजनेअंतर्गत दरमहा 1,500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. मात्र, लाभ मिळवण्यासाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी असावे आणि कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा. तसेच, लाभार्थी महिला अन्य कोणत्याही शासकीय योजनेतून मासिक अनुदान घेत नसावी.
सरकार आता आरटीओकडून वाहनधारक लाभार्थ्यांची यादी मागवत आहे. या महिना अखेर पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
🔴 हेही वाचा 👉 आता लगेच समजणार! लाडक्या बहिणीच्या कुटुंबात चारचाकी वाहन आहे का? हा मोठा निर्णय लवकरच….
विरोधकांचा सरकारला विरोध
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे. काँग्रेस प्रवक्ते गोपाल तिवारी म्हणाले की, “महिलांच्या कुटुंबातील सदस्य कारधारक असला तरी अनेक महिला बेरोजगार आहेत. अशांना अपात्र ठरवणे अन्यायकारक आहे.”
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले, “महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी महिलांना आर्थिक मदतीचे आश्वासन दिले. मात्र, आता घरात चारचाकी आहे म्हणून अशा महिलांकडून हा लाभ काढून घेतला जात आहे. हा सरळसरळ धोका आहे.”
महिला लाभार्थ्यांचे मत काय?
पिंपरी-चिंचवडमधील एका लाभार्थी महिलेने सांगितले, “मी तीन वर्षांपूर्वी नोकरी गमावली. उत्पन्न नाही, पण घरात कार आहे. अशा परिस्थितीत योजना रद्द करणे योग्य नाही.”
सरकारने स्पष्ट केले आहे की, कुटुंबातील सदस्याच्या नावावर चारचाकी असलेल्या महिलांना माझी लाडकी बहीण योजनेसाठी (Mazi Ladki Bahin Yojana) अपात्र ठरवले जाणार आहे.
🔥 लेटेस्ट अपडेट 👉 सोन्या-चांदीचा आजचा दर 5 फेब्रुवारी 2025.
सरकारचा हा निर्णय अनेक महिलांसाठी अडचणी निर्माण करू शकतो. यामुळे हजारो महिला योजनेसाठी अपात्र ठरू शकतात. विरोधकांनी या धोरणाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आता पाहावे लागेल की, सरकार या निर्णयावर कायम राहते की घरात चारचाकी असणाऱ्या लाभार्थ्यांसाठी काही शिथिलता देण्यात येते.