लाडकी बहिन योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार? या महिलांच्या खात्यातच येणार पैसे! Ladki Bahin Yojana 8th Installment

3 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana 8th Installment Payment Date

Majhi Ladki Bahin Yojana 8th Installment Payment Date : महाराष्ट्र सरकारच्या माझी लाडकी बहिन योजनेचा (Majhi Ladki Bahin Yojana) 8वा हप्ता कधी जमा होणार, याची उत्सुकता करोडो महिलांना आहे.

कोणत्या महिलांना मिळणार नाहीत पैसे?

मागील महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते की, अनेक महिलांचे नावे या योजनेतून वगळण्यात येणार आहेत. यामागचे कारण म्हणजे त्या महिलांनी पात्रतेचे नियम पूर्ण केलेले नाहीत. खालील अटी पूर्ण न करणाऱ्या महिलांना 8वा हप्ता मिळणार नाही:

  • महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी.
  • वय 21 ते 65 दरम्यान असावे.
  • बँक खाते आधार व मोबाईल नंबरशी लिंक असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी महिलांनी योजनेअंतर्गत DBT सुविधा सक्रिय ठेवली पाहिजे.
  • काही महिलांचे अर्ज चुकीच्या माहितीमुळे नाकारले गेले आहेत.

🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेबाबत नवीन नियम; आता ‘या’ महिलांना मिळणार नाही लाभ!.

कधी जमा होणार 8वा हप्ता?

Majhi Ladki Bahin Yojana 8th Installment Date : मीडिया रिपोर्टनुसार, फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जमा केला जाणार आहे. बहुधा 15 फेब्रुवारी 2025 रोजी सरकारकडून हा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात वर्ग केला जाण्याची शक्यता आहे. मात्र, या तारखेबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

महिला आपल्या नावाची खात्री कशी करू शकतात?

जर तुम्ही माझी लाडकी बहिन योजनेच्या (Mazi Ladki Bahin Yojana) लाभार्थी असाल, तर तुमचे बँक खाते आधार व मोबाईल नंबरशी लिंक असल्याची खात्री करा. तसेच, तुमचे नाव पात्र लाभार्थींच्या यादीत आहे का, हे जाणून घेण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत, आंगणवाडी केंद्र किंवा CSC सेंटरला भेट द्या.

योजनेतून चुकून नाव वगळले गेल्यास काय करावे?

जर तुमचे नाव योजनेतून वगळले गेले असेल आणि तुम्हाला खात्री असेल की तुम्ही पात्र आहात. तर तुम्ही पुन्हा अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:

  1. आधार कार्ड
  2. पत्ता पुरावा (रहिवासी दाखला, वीज बिल इ.)
  3. बँक खाते तपशील आणि पासबुक
  4. अर्जदाराचा मोबाईल नंबर

महिला CSC सेंटर, ग्रामपंचायत किंवा आंगणवाडी केंद्रात जाऊन अर्ज करू शकतात.

15 फेब्रुवारी 2025 रोजी माझी लाडकी बहिन योजनेचा 8वा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. परंतु, सर्व महिलांना हा हप्ता मिळणार नाही. पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे.

🔴 हेही वाचा 👉 पुण्यात ‘या’ तारखेपासून सुरू होणार तपासणी, चारचाकी वाहन असलेल्या महिलांचे अर्ज बाद.

Share This Article