Ladki Bahin Yojana Not Closed Uday Samant : राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही. उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी यासंदर्भात मोठा खुलासा केला आहे. लाभार्थी महिलांची नवीन पडताळणी प्रक्रिया सुरू असून, या पडताळणी अंतर्गत अपात्र महिलांची नावे वगळली जात आहेत.
५ लाख महिलांची नावे का कमी करण्यात आली?
राज्य सरकारकडून माझी लाडकी बहीण योजनेतील (Mazi Ladki Bahin Yojana) लाभार्थ्यांची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. गेल्या एका महिन्यात ५ लाख महिलांची नावे रद्द करण्यात आली आहेत. यामागील प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत –
✔ ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिलांना लाभ नाही.
✔ चारचाकी वाहन असलेल्या महिलांना अपात्र ठरवण्यात येत आले.
✔ वार्षिक उत्पन्न ₹२.५० लाखांपेक्षा जास्त असल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही.
लाडकी बहिण योजनेबाबत सरकारची भूमिका
राज्य सरकारने जुलै 2024 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली. या योजनेद्वारे दरमहा १,५०० रुपये आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत २.४६ कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.
🔥 हेही वाचा 👉 या लाडक्या बहिणींना आता मिळतील फक्त ५०० रुपये, या यादीत तुमच नाव तर नाही?.
विरोधकांचा आक्षेप आणि सरकारची प्रतिक्रिया
राज्यात विरोधकांनी या पडताळणीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. काही नेत्यांचे म्हणणे आहे की या प्रक्रियेच्या नावाखाली सरकार योजना बंद करू शकते. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नांदेडमधील एका सभेत सांगितले की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही.
महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी सांगितले की, अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी सरकारने आयकर विभाग आणि परिवहन विभागाची मदत घेतली आहे.
योजनेतील बदलांबाबत महिलावर्गात चिंता
पडताळणी सुरू झाल्यानंतर सुमारे ५,००० महिलांनी स्वयंप्रेरणेने योजना सोडली. सरकारच्या म्हणण्यानुसार, योजनेचा लाभ फक्त गरजू महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.
🔴 नोकरी 👉 महसूल व वन विभाग भरती २०२५ – अधिकृत जाहिरात आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या.