Ladki Bahin Yojana Ineligible Women Refund Process : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) आजची दुसरी मोठी अपडेट समोर आली आहे. या योजनेत अपात्र ठरलेल्या महिलांकडून सरकार पैसे परत घेणार आहे. महिलांनी पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, पुण्यात जवळपास ७५ हजार महिलांनी यासाठी अर्ज केला आहे.
महिला व बालविकास विभागाने यासाठी स्वतंत्र ‘हेड’ तयार केला आहे. यापूर्वी हेड नसल्याने अपात्र महिलांकडून पैसे परत घेणे शक्य नव्हते. मात्र, आता शासनाने ही प्रक्रिया सोपी केली आहे.
कोणत्या महिलांना पैसे परत करावे लागणार?
शासन निर्णयानुसार, २८ जून २०२४ आणि ३ जुलै २०२४ रोजी काही महिलांना माझी लाडकी बहीण योजनेतून (Mazi Ladki Bahin Yojana) वगळण्यात आले. यामध्ये खालील महिलांचा समावेश आहे:
- संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी महिला – २,३०,०००
- ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला – १,१०,०००
- कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहन असलेल्या महिला
- नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी महिला
- योजनेंतून स्वेच्छेने नाव मागे घेतलेल्या महिला – १,६०,०००
- एकूण अपात्र महिला – ५,००,०००
अपात्र महिलांची पैसे परत करण्याची तयारी
अपात्र ठरलेल्या महिलांना योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे अशा महिलांनी स्वतःहून पैसे परत करण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा परिषद कार्यालयांबाहेर यासाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत.
ज्यांनी अपात्र असूनही या योजनेचा लाभ घेतला, त्यांच्यावर सरकार कारवाई करू शकते. ही भीती असल्याने अनेक महिला पैसे परत करण्यासाठी पुढे सरसावत आहेत.
🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेबाबत सरकारचा महत्त्वाचा निर्णय, अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा.
सरकारचा निर्णय काय?
महिला व बालविकास विभागाने पैसे परत घेण्यासाठी नवीन प्रक्रिया सुरु केली आहे. राज्यभरात लवकरच सर्व जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया राबवली जाणार आहे.
महाराष्ट्र सरकारने स्पष्ट केले आहे की, पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत राहील. अपात्र ठरलेल्या महिलांनी लवकरात लवकर पैसे परत करावेत, अन्यथा त्यांच्यावर सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी कठोर कारवाई होऊ शकते.
🔴 हेही वाचा 👉 बांधकाम कामगारांसाठी नवीन नियम लागू, सर्व प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे आदेश.